Solar Pump
Solar Pump
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वीज जोडणी करिता महावितरण कडे कोटेशन भरले आहे.परंतु अद्याप पर्यंत वीज जोडणी झाली नाही अशा शेतकऱ्यांना महावितरणकडून सोलर पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Table of Contents
ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशा शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपली नोंदणी करणे गरजेचे आहे.त्याची लिंक आम्ही खाली देत आहोत.महावितरणकडून शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची पडताळणी केली जाईल.तसेच व्हेरिफिकेशन साठी शेतकऱ्यांना एक ओटीपी पाठवून व्हेरिफिकेशन केले जाईल.
मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी देऊन सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
शेतकऱ्यांची वीज बिलापासून होईल कायमची सुटका
सौर ऊर्जा हा अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत आहे.तसेच तो पर्यावरणास देखील पूरक आहे.सौर ऊर्जेच्या माध्यमातून पर्यावरणास कसलीही हानी पोहोचत नाही.शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप स्वस्त किमतीमध्ये मिळणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांची वीज बिलापासून कायमची सुटका होणार आहे.त्याचाच फायदा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मिळणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज
Solar Pump
शेतकऱ्यांना शेतात पिकाला पाणी देण्यासाठी लाईटच्या वेळेनुसार जावे लागते.कधी कधी लाईट ची वेळ ही रात्रीची देखील असते.त्यावेळी देखील शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून शेतात जावे लागते.परंतु सौर पंप जोडणी केल्यास शेतकऱ्यांना सतत दिवसा वीज मिळणार आहे.
हे पण वाचा:- शेतजमीन एनए कशी करायची?जाणून घ्या सविस्तर
योजनेचा लाभ कसा घ्यायचा?Solar Pump
मुख्यमंत्री सौर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरण विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जावून ऑनलाईन अर्ज करावा लागेल.अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना आपला वीज ग्राहक क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांकाची माहिती द्यावी लागेल.अर्ज करताना शेतकऱ्यांना आपले नाव,पत्ता, शेत जमिनीचा सर्व्हे नंबर तसेच इतर माहिती भरावी लागेल.
महावितरण विभागाकडून केलेल्या अर्जाची स्वीकृती झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याबाबत कळविले जाईल.तसेच शेतकऱ्यांच्या शेतात विनामोबदला सौर पंप बसविला जाईल.राज्यात सुमारे या योजनेचा पाच लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.