Land NA:- तुमची जमीन एनए करायचीय,जाणून घ्या सविस्तर माहिती!Apply Now

Spread the love

Land NA

Land NA
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आपल्या पैकी बऱ्याच शेतकऱ्यांना आपली जमीन एन.ए (नॉन ॲग्रिकल्चर) कशी करायची या बद्दलची माहिती नसते.आज आपण या लेखाच्या माध्यमातून आपली जमीन एन.ए म्हणजे काय? कशी करायची ? या बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

जमीन एन.ए म्हणजे काय?
Land NA

सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर हा शेतीसाठी केला जातो. परंतु शेत जमिनीचा वापर इतर कारणांसाठी जसे की औद्योगिक,वाणिज्य किंवा निवासी कारणांसाठी करावयाचा असल्यास शेतीच्या क्षेत्राचे रूपांतरण हे बिगर शेतीमध्ये करणे आवश्यक असते.शेतीच्या जमिनीचे बिगर शेतीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला N.A नॉन ॲग्रिकल्चर किंवा अकृषिक असे म्हटले जाते त्यासाठी एक प्रकारचा कर आकारला जातो.

महाराष्ट्र राज्यात तुकडेबंदी कायदा लागू असल्याने ज्या जिल्ह्यात तुम्ही राहता त्या जिल्ह्यातील जमिनीचे तुकड्याचे जेवढे क्षेत्र आहे त्या पेक्षा कमी जमिनीचा तुकडा तुम्हाला विकता येत नाही.तो विकण्यासाठी एन.ए ले आऊट करूनच विकावा लागतो.

एन.ए. करण्यासाठी अर्ज कुठे करायचा ?

तुम्हाला तुमची शेत जमीन एन.ए करावयाची असल्यास तुमच्या तालुक्याचा ठिकाणी असलेल्या तहसीलदार कार्यालयात तुम्हाला त्यासाठी अर्ज करावा लागेल.

एन.ए करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Land NA Required Documents

१.जी जमीन एन.ए करावयाची आहे त्या जमिनीचा सात बारा उतारा
२.सातबाऱ्याशी संबंधित फेरफार उतारा
३.मिळकत पत्रिका
४.प्रतिज्ञापत्र
५.ज्या शेत जमिनीचे एन.ए मध्ये रूपांतर करावयाचे आहे त्या जमिनीचा चतु:सीमा दर्शवणारा नकाशा
६.संबंधित जमिनीचा सर्व्हे किंवा गट नंबरचा नकाशा
७.आर्किटेकने तयार केलेल्या बांधकाम लेआऊटच्या प्रती इ.

हे पण वाचा:- अखेर तारीख ठरली, या दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता

एन.ए. करण्याच्या प्रक्रियेत झालेले बदल
Land NA

१.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42(ब) या सुधारणेनुसार,जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रामध्ये अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल,तर अशा क्षेत्रातील जमीन एन.ए. करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज पडणार नाही.

२.कलम 42(क) या सुधारणेनुसार,तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल,तर या क्षेत्रातील जमिनींचा वापर अकृषिक कारणांसाठी केला जाऊ शकेल.

३.कलम 42(ड) या सुधारणेनुसार कोणत्याही गावाच्या गावठाण क्षेत्रापासून 200 मीटरच्या आतील जमिनीचा एन.ए. करायचा असेल तर जमिनीचा सातबारा उतारा,फेरफार उतारा आणि ग्रामपंचायतीचे गावठाण पत्र ही कागदपत्र अर्जासोबत जोडावी लागतात.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment