Namo Shetkari Yojana Installment Date:- अखेर तारीख ठरली,या दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता 2000 रुपये !

Spread the love

Namo Shetkari Yojana Installment Date

Namo Shetkari Yojana Installment Date
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेची घोषणा केली होती.

नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार अर्थसहाय्य दिले जाणार आहे.या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकरी पात्र असणार आहेत.मागील काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या वित्त विभागाने या योजनेसाठी 1720 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती.

हे पण वाचा:- या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार महिन्याला तीन हजार रुपये

पीएम किसान योजनेचे लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लाभार्थी या योजनेकरीता पात्र असणार आहेत.शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसानचे १४ हप्ते मिळाले आहेत.१५ व्या हप्त्यासाठी सरकारने पात्र शेतकऱ्यांना ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली होती.त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एक ही हप्ता मिळाला नव्हता.

या दिवशी मिळणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता Namo Shetkari Yojana Installment Date

अखेर नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या वाटपासाठी मुहूर्त मिळाला आहे.आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते साई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणार आहेत. त्यादिवशी साई बाबांचे दर्शन घेणार आहेत.त्यांचा हस्ते नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांचा खात्यावर वितरित केला जाणार आहे.यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहेत.

हे पण वाचा:- या योजनेच्या माध्यमातून सरकार देतयं 50 हजार रुपये अर्थसहाय्य

यासाठी पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्याचे देखील नमो किसान पोर्टल तयार करण्याची जबाबदारी महाआयटीने घेतली असून त्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment