Namo Shetkari Yojana 1st Installment:- नमो शेतकरी योजनेची अपात्र यादी जाहीर,यादीत नाव असेल तर नाहीत मिळणार 2000 रुपये!

Spread the love

Namo Shetkari Yojana 1st Installment

Namo Shetkari Yojana 1st Installment
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाइट पोर्टलवर आपले स्वागत आहे.केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. सदर योजनेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा केला जाणार आहे.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 2 हजार रुपयांचे गिफ्ट म्हणून पहिला हप्ता दिला जाणार असल्याचे सांगितले आहे.यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

हे पण नक्की वाचा:- या योजनेच्या अंतर्गत मुलींना मिळणार एक लाख रूपये

ई केवायसी पूर्ण करावी

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा लाभ घेण्याकरिता ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.जे शेतकरी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार नाहीत.

दिवाळीपूर्वी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार कडून देखील 1720 कोटी रुपयांचा निधी कृषी विभागाला प्राप्त झाला आहे.

केंद्र सरकार कडून अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.ती पाहण्यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.त्याची लिंक आम्ही खाली देत आहोत.तिथे तुम्हाला तुमचे राज्य,जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे तुमच्या समोर तुमच्या गावातील पात्र शेतकऱ्यांची यादी दिसेल.जर तुमचे नाव यादीत असेल तर तुम्ही पात्र आहात.

नमो शेतकरी योजना अपात्र यादी जाहीर नाव पहा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment