Lek Ladki Yojana 2023:- आनंदाची बातमी,या योजने अंतर्गत मुलींना मिळणार एक लाख रुपये,राज्य सरकारचा नवीन निर्णय जाहीर!

Spread the love

Lek Ladki Yojana 2023

Lek Ladki Yojana 2023
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने 10 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुलींच्या सक्षमीकरण करण्यासाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्या निर्णयाबाबत सविस्तर पणे आपण जाणून घेणार आहेत.

लेक लाडकी योजनेची घोषणा

महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यात गरीब कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी 1 लाख 1 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.

असा मिळेल लाभ
Lek Ladki Yojana 2023

१.पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये

२.इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये • सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये

३.११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये

४.१८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये

हे पण वाचा:- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 472 कोटी रुपयांची नुकसान भरपाई

अशा रितीने त्या मुलीस एकूण १ लाख १ हजार रुपये इतका लाभ मिळणार आहे.
अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा केली होती.

लाभ मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता
Lek Ladki Yojana 2023

  1. सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता मुलीचा जन्म
    १ एप्रिल २०२३ नंतर झाला असावा
    2.एका कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
    3.त्याचप्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास देखील लाभ घेता येणार आहे.
    4.दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment