Free Electricity Yojana
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील वस्त्रोद्योग वाढीस चालना देण्यासाठी राज्य सरकारने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ जाहीर केले आहे. सदर धोरणाच्या अनुसरून हातमाग विणकरांना उपजीविकेचे संरक्षण सुनिश्चित करून हातमाग वस्त्रोद्योग विणकरांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्याच्या दृष्टीने अतिरिक्त प्रोत्साहन देणे हे एक उद्दिष्ट आहे.
Table of Contents
सदर वस्त्रोद्योग धोरणाच्या निर्णयानुसार राज्यातील हातमाग विणकरांच्या कुटुंबांना प्रति महिना २०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.हा शासन निर्णय राज्य सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत घेण्यात आला आहे.
योजनेसाठी आवश्यक पात्रता Free Electricity Yojana
१.लाभार्थी हातमाग विणकर हा केंद्र शासनाच्या सर्वात अलीकडचे हातमाग अंतर्गत नोंदणीकृत विणकर असावा व त्यांच्याकडे तसे ओळखपत्र असावे.
२.एकाच कुटुंबात जास्त लाभार्थी असतील तर फक्त एकच लाभार्थी सदर योजनेसाठी अर्ज करु शकेल.
३.अर्जाच्या दिनांकापूर्वी सहा महिन्यापासून विणकर व्यवसायात कार्यरत असावा. विणकाम करत असल्याचा मागील ६ महिन्याचा पुरावा म्हणून कच्चा माल खरेदीचे बील/पक्का माल विक्रीचे बील/महामंडळ, महासंघ अथवा संस्थेचा सभासद असल्यास सदर विणकरास विणकाम मजूरी दिल्याबाबत संबंधित संस्थेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
४.अर्जदाराकडे महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दाखला असणे आवश्यक.
हे पण वाचा:- आता रेशन कार्डवर मिळणार मोफत साडी, राज्य सरकारचा मोठा निर्णय!
५.लाभार्थी हातमाग विणकर कुटुंबाचे नावे वीज जोडणी असावी.
६.हातमाग विणकरांच्या कुटुंबाना दरमहा १ ते २०० युनिट पर्यंत (२०० युनिट) मोफत वीज शासनामार्फत देण्यात येईल त्यापेक्षा जास्त म्हणजे २०० युनिटच्या वर वापर झालेल्या बीलाची रक्कम स्वत: लाभार्थ्याला भरावी लागेल.
७.विणकर कुटुंबाने वीज बील देयकाची रक्कम नियमीत भरणा करणे गरजेचे राहिल. विलंब बील भरणा आकारणीची रक्कम शासनाकडून देय होणार नाही.
८.सदर योजनेतील लाभार्थी हातमाग विणकरांचा शासन यंत्रणेद्वारे नियमित आढावा घेण्यात येईल. सदर आढाव्यामध्ये हातमाग व्यवसाय सोडला असल्याचे आढळून आल्यास असा लाभार्थी वीज अनुदान सवलतीस पात्र राहणार नाही.
मोफत वीज योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.