Free Sadi Vatap Yojana:- आता रेशन कार्डवर मिळणार मोफत साडी,राज्य सरकारचा मोठा निर्णय!

Spread the love

Free Sadi Vatap Yojana

नमस्कार मित्रांनो आमच्या एमएच खबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्य सरकारच्या सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाने राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य सरकारने २०२३-२८ या वर्षांकरिता एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे.या धोरणाच्या अन्वये राज्यातील दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक कुटुंबांना दरवर्षी एक मोफत साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दि. १७.०७.२०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या दारिद्रय रेषेखालील (पिवळी शिधापत्रिकाधारक) कुटुंबांचा अंत्योदय अन्न योजना कुटुंब गटात समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबाना वस्त्रोद्योग विभागामार्फत दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.Free Sadi Yojana

योजनेचा कालावधी Free Sadi Vatap Yojana

सरारची योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्यात सन २०२३ ते २०२८ या पाच वर्षांकरिता निश्चित करण्यात येत आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी शेळी मेंढी,दुधाळ गाई म्हशी,कुक्कुटपालन साठी ऑनलाईन अर्ज सुरू!

कोणाला लाभ मिळणार?

१.राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

२.अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार दि.३१ डिसेंबर २०२२ पर्यत राज्यात अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांची संख्या २४,५८,७४७ इतकी आहे.

३.दरवर्षी अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांच्या संख्येत वाढ/ घट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या संख्येनुसार सदर योजनेच्या लाभार्थ्याच्या संख्येत वाढ/घट होणार आहे.

राज्य सरकारकडून या साडीची किंमत सेवाशुल्कासह ३५५/- रुपये निश्चित करण्यात आला आहे.परंतु दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.मोफत साडीचे वाटप रेशन दुकानदारांच्या माध्यमातून राज्यातील गुढीपाडवा,बाबासाहेब आंबेडकर जयंती,दसरा किंवा दिवाळी यांसारख्या सणाच्या वेळी केले जाणार आहे.

मोफत साडी वाटप योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment