MGNREGA:- आनंदाची बातमी,विहीरीसाठी मिळणार 4 लाख रुपये अनुदान,ही जाचक अट देखील रद्द!

Spread the love

MGNREGA
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MGNREGA) अंतर्गत विहिरीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.सुरुवातीला अनुदानाची रक्कम ही 3 लाख रुपये होती.परंतु आता विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.

सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आपले क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी याचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांना आर्थिक फायदा मिळणार आहे.शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान मिळणार असल्याने त्यांचा खर्च देखील कमी होणार आहे.

लाभार्थी पात्रता
•अनुसूचित जातीतील अर्जदारास प्राधान्य
•अनुसूचित जमातीतील अर्जदारास प्राधान्य
•भटक्या जमातीतील अर्जदार
•विमुक्त जातीतील अर्जदार
•दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
•इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
•स्त्री कर्ता असलेली कुटुंबे
•जमीन सुधारणांचे लाभार्थी
•विकलांग आणि दीव्यांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
•अल्प भूधारक शेतकरी आणि सीमांत शेतकरी

शेतीसाठी विहीर खोदताय,मग असे मिळवा ४ लाख रुपये अनुदान !

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
•जमिनीचा डिजिटल सात बारा उतारा
•जमिनीचा डिजिटल ८अ उतारा
•जॉबकार्ड ची प्रत
•सिंचन विहिरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने सिंचन विहिरीसाठी खोदण्यासाठी दोन विहिरींच्या मधील अंतराची जाचक अट देखील रद्द करण्यात आली आहे.त्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना ही अट रद्द केल्यामुळे या योजनेचा फायदा घेता येणार आहे.तसेच सिंचन विहीर खोदण्यासाठी तसेच पाईप आणि विद्युत पंपासाठी अनुदान मिळणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment