Mahadbt Pashu Yojana:- शेतकऱ्यांनो शेळी-मेंढी, दुधाळ गाई-म्हशी, कुक्कुटपालन साठी ऑनलाईन अर्ज सुरू!

Spread the love

Mahadbt Pashu Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असतात.शेतकऱ्यांना आर्थिक सदृढ करणे तसेच त्यांचे जीवनमान उंचावणे हा योजनांचा मुख्य हेतू असतो.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी अशीच एक योजना राबविण्यात येत आहे.या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दुधाळ गाई-म्हशी,शेळी-मेंढी,कुक्कुट पक्षी तसेच तलंगा गट वाटप करण्यात येत आहे.

या योजनेच्या माध्यमातून १००० मांसल कुक्कुट पालन तसेच १०० कुक्कुट पिलांचे वाटप आणि २५+३ तालंगा गट वाटप करण्यात येतात.ग्रामीण भागातील पशुपालकांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे.

योजनेसाठी ऑनलाईन पशुसंवर्धन विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या साठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर किंवा मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून देखील अर्ज करण्यात येणार आहे.Mahadbt Pashu Yojana

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

•आधार कार्ड
•पॅन कार्ड
•बँक पासबुक
•पासपोर्ट आकाराचे फोटो
•तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला (मर्यादा २ लाख रुपये)

सदर योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.पशुपालन व्यवसाय करण्यासाठी अर्जदाराकडे किमान १०० चौरस मीटर जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.तसेच या अगोदर पशू संवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

सदर योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.पशुपालन व्यवसाय करण्यासाठी अर्जदाराकडे किमान १०० चौरस मीटर जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.तसेच या अगोदर पशू संवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

हे पण वाचा:- या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना मिळणार २०,०००/- रुपयांची आर्थिक मदत!

अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना दिलेला मोबाईल क्रमांक कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलू नये. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर पशू संवर्धन विभागामार्फत अर्जाच्या स्थितीबाबत वेळोवेळी संदेश पाठविण्यात येतो.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मोबाईल मध्ये ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेच्या अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत टोल फ्री क्रमांक देखील देण्यात आला आहे त्या क्रमांकावर कॉल करून देखील सविस्तर माहिती जाणून घेता येते.
टोल फ्री क्रमांक १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ वर संपर्क साधावा.Mahadbt Pashu Yojana

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment