Dairy Farming Loan:- विनातारण,शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी मिळणार सुलभ कर्ज, पाहा योजना

Spread the love

Dairy Farming Loan

Dairy Farming Loan
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आज आपण दुग्ध व्यवसायासाठी कर्ज कसे घ्यायचे याची सविस्तर माहिती या लेखामधून जाणून घेणार आहोत.शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी विविध बँका कर्ज पुरवठा करत असतात.

आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्ज योजनेविषयी माहिती जाणून घेऊ. जर तुम्हाला दुग्ध व्यवसाय करण्यासाठी कर्जाची आवश्यकता असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत संपर्क साधावा लागेल.स्टेट बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांना इतर बँकांच्या तुलनेत कमी व्याजदराने दुग्ध व्यवसायासाठी विना तारण कर्ज पुरवठा करीत आहे.

कर्जाची मर्यादा किती असेल?
Dairy Farming Loan

दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या दूध संकलन प्रणाली मशीन खरेदीसाठी बँक जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करते.तसेच डेअरी युनिट बांधकामासाठी 2 लाख रुपये,दूध वाहतुकीसाठी व्हॅन खरेदी करण्यासाठी 3 लाख रुपये कर्ज पुरविते.

तसेच दूध थंड ठेवण्यासाठी शीतकरण यंत्र बसवण्यासाठी 4 लाख रुपयांपर्यंत कर्जाचा पुरवठा केला जातो. कर्जदाराला हे कर्ज 6 महिने ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये परतफेड करावे लागते.

कर्जासाठी काहीही तारण ठेवावे लागत नाही

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपली कोणतीही मालमत्ता तारण ठेवावी लागत नाही.या योजनेच्या माध्यमातून दूध संकलन,इमारत बांधकाम,वाहन खरेदीसाठी १०.८५ टक्के ते २४ टक्क्या पर्यंत व्याजदर आकाराला जातो.

हे पण वाचा:- आता फक्त 3 रुपयांत काढता येणार जनावरांचा विमा

सबसिडी देखील मिळते

नाबार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या योजनेसाठी अनुदान देखील दिले जाते.त्यासाठी उद्योजकाला प्रकल्पाची फाईल करून नाबार्ड कार्यालयात जमा करावी लागेल. दुग्धउद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 25 टक्के अनुदान दिले जाते. आरक्षित कोट्यातील शेतकऱ्यांना 33 टक्के अनुदान दिले जाते.Dairy Farming Loan

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment