Online Ration Card | आता 30 दिवसांत काढा ऑनलाईन रेशन कार्ड तेही घरबसल्या,अर्ज कसा करायचा जाणून घ्या सविस्तर!

Spread the love

Online Ration Card
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आजच्या लेखामधून आपण ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड कसे काढायचे याची सविस्तर प्रक्रिया (Online Ration Card Process) जाणून घेणार आहेत.आपल्या संपूर्ण देशात रेशन कार्ड हा रहिवाशी पत्ता म्हणून महत्त्वाचे दस्तऐवज आहे.

केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड(Online Ration Card) आवश्यक आहे.रेशन दुकानातील वस्तूंचा लाभ घेण्यासाठी देखील रेशन कार्ड खूप महत्त्वाचे आहे.आताच मोदी सरकारने रेशन कार्ड धारकांना 5 वर्षे मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी देखील रेशन कार्ड आवश्यक असणार आहे.

ऑनलाईन तंत्रज्ञानाच्या युगात मागील काही वर्षांपासून रेशन कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे आता नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही.आवश्यक कागदपत्रांसह घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड काढता येणार आहे.

हे पण वाचा:-आता रेशन कार्डवर मिळणार मोफत साडी,राज्य सरकारचा मोठा निर्णय!

ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
•ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाफुड पोर्टलवर भेट द्यावी लागेल. https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx_ त्यासाठी येथे क्लिक करा.
•वेबसाईट ओपन झाल्यानंतर महाफूड पोर्टल वरील Public Login वर क्लिक करा.
•त्यांनतर Register बटणावर क्लिक करा.
•तिथे आवश्यक ती माहिती भरून Submit करा.
•त्यानंतर तुम्हाला OTP येईल तो OTP टाकून Login करा.
•पुढे New Ration Card या ऑप्शनवर क्लिक करा.तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल तिथे आवश्यक ती माहिती भरून Submit करा.
•ही सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सादर झाल्याचा मेसेज येईल.

आवश्यक कागदपत्रे
•अर्जदाराचे आधार कार्ड
•अर्जदाराचे पॅन कार्ड
•मतदान ओळखपत्र
•पासपोर्ट आकाराचे फोटो
•जन्माचा दाखला(१८ वर्षांखालील मुलांसाठी)
•विवाह नोंदणी दाखला(विवाहित व्यक्तींसाठी)
•रहिवाशी दाखला

अर्ज शुल्क
रेशन कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ३३.६० रुपये इतके शुल्क भरावे लागते.हे शुल्क भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यास अर्जामध्ये कोणतीही त्रुटी न आढळल्यास अर्जदाराला ३० दिवसांच्या आत रेशन कार्ड मिळते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment