Yashwantrao Gharkul Yojana
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.घरकुलाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमधील नवीन घरकुलांना शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक घरकुल यादीच्या प्रतीक्षेत होते.अखेर नवीन घरकुलांच्या बांधकामासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना
महाराष्ट्र राज्यात इतर बहुजन विकास विभागाच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण घरकुल योजना राबविली जात आहे.या योजनेच्या अंतर्गत मागील काही दिवसांपासून अनेक पात्र नागरिकांनी आपले अर्ज दाखल केले होते आता पात्र लाभार्थ्यांची यादी महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला आहे.राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना यशवंतराव चव्हाण घरकुल योजना अंतर्गत घरकुलाचा लाभ दिला जातो.
या ९ जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध Yashwantrao Gharkul Yojana
महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेसाठी राज्यातील ९ जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.या मध्ये गोंदिया ,चंद्रपूर,भंडारा, सातारा,रत्नागिरी, नागपूर,सांगली,धाराशिव,लातूर या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.या ९ जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांची यादी खालील प्रमाणे.
हे पण वाचा:- या समाजासाठी सरकारची नवीन घरकुल योजना, मिळणार १.३० लाख रुपये अनुदान व ५ गुंठे जागा!
लाभार्थ्यांना करावे लागेल हे काम Yashwantrao Gharkul Yojana
१.विमुक्त जाती तसेच भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे.
२.ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र असेल त्याच व्यक्तीस लाभ देण्यात येणार आहे.इतर कोणत्याही व्यक्तीला लाभ दिला जाणार नाही.
३.लाभार्थ्यांना सन २०२३-२४ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागणार आहे.
४.सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत अधिवास प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
५.लाभार्थ्यांच्या नावामध्ये काही तफावत असल्यास आपल्या नावाचा किंवा आडनावाचा पुरावा सादर करावा लागणार आहे.
६.लाभार्थ्यांनी या पूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतला असल्यास दुबार लाभ मिळणार नाही.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना लाभार्थी यादी Gharkul Yadi Pdf Download
जिल्ह्याचे नाव | लाभार्थी यादी |
१.भंडारा जिल्हा | येथे क्लिक करा |
२.गोंदिया जिल्हा | येथे क्लिक करा |
३.लातूर जिल्हा | येथे क्लिक करा |
४.धाराशिव जिल्हा | येथे क्लिक करा |
५.सातारा जिल्हा | येथे क्लिक करा |
६.सांगली जिल्हा | येथे क्लिक करा |
७.रत्नागिरी जिल्हा | येथे क्लिक करा |
८.नागपूर जिल्हा | येथे क्लिक करा |
९.चंद्रपूर जिल्हा | येथे क्लिक करा |
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.