यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना : Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2023

Spread the love

Yashwantrao Chavan Gharkul Yojana

नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य शासनाकडून राज्यातील विविध घटकांना न्याय मिळावा या करिता खूप प्रकारच्या योजना राबविल्या जात असतात.राज्यातील गरीब कुटुंबातील व्यक्तींना पक्की घरे मिळावीत यासाठी विविध घरकुल योजना राबविल्या जात आहेत.यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना,इंदिरा आवास योजना,रमाई घरकुल योजना,शबरी घरकुल योजना अशा विविध प्रकारच्या घरकुल योजना राबविल्या जात आहेत.

Table of Contents

काय आहे योजना?
Yashwantrao Chavan Gharkul Yojana

महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यातील विमुक्त जाती तसेच भटक्या जमाती या प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविली जात आहे.राज्यातील विमुक्त जाती,भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे,त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी ग्रामीण भागामध्ये अशा कुटुंबांना या योजनेच्या अंतर्गत घरकुल देण्यात येणार आहे.

योजनेचा उद्देश

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्रवर्गातील व्यक्तींना विकासाच्या मुळ प्रवाहात आणणे.त्यांचे राहणीमान उंचावे, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे,त्यांना स्थिरता प्राप्त करून देणे.यासाठी त्यांना जमीन उपलब्ध करून तेथे वसाहत उभी करून देणे व त्या ठिकाणी त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना शासन निर्णय (GR)

Yashwantrao Chavan Gharkul Yojana

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने १२ ऑगस्ट २०१४ रोजी शासन निर्णय (GR) काढून राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.या शासन निर्णयामध्ये लाभार्थी पात्रता,लाभाचे निकष,आवश्यक कागदपत्रे इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना संदर्भातील शासन निर्णय खाली देण्यात आला आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अर्ज PDF Yashwantrao Chavan Gharkul Yojana

Yashwantrao Chavan Gharkul Yojana

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना साठी शासनाकडून अधिकृत फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे.सदरची योजना समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येत आहे.यासाठी फक्त ऑफलाईन पद्धतीनेच फॉर्म भरता येणार आहे.त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची तरतूद सध्या तरी उपलब्ध नाही.यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना साठी आवश्यक फॉर्म PDF आम्ही खाली उपलब्ध करून दिला आहे.

या कुटुंबांना मिळणार प्राधान्य Yashwantrao Chavan Gharkul Yojana

Yashwantrao Chavan Gharkul Yojana

महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत लाभार्थी निवड करताना विधवा स्त्रिया,विधुर पुरुष,अपंग व्यक्ती,अनाथ असलेल्या व्यक्ती,परितक्त्या तसेच वयोवृद्ध असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्याने समावेश करण्यात येणार आहे.(Yashwantrao Chavan Gharkul Yojana)

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत घरकुलासाठी किती पैसे मिळतात?

•यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी ग्रामीण भागातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांना प्रत्येकी ५ गुंठे जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
•लाभार्थी कुटुंबाला त्या जागेवर २६९ चौ.फू.ची घरे बांधावी लागणार आहेत.
•ग्रामीण भागातील एकूण ३३ जिल्ह्यांमधील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाची जास्त लोकसंख्या असलेली प्रत्येक जिल्ह्यातील ३ गावे निवडून त्या गावातील एकूण २० कुटुंबांना सदरच्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.(Yashwantrao Chavan Gharkul Yojana)
•सुरुवातीला या घरकुल योजनेच्या बांधकामाकरिता ७० हजार रुपये अनुदान दिले जात होते.
•परंतु आता वाढती महागाई लक्षात घेता डोंगराळ भागातील लाभार्थ्यांकरिता १.३० लाख रुपये आणि सर्वसाधारण क्षेत्रातील लाभार्थ्यांकरिता १.२० लाख रुपये इतके अनुदान देण्यात येत आहे.

हे पण वाचा:- या योजनेच्या अंतर्गत ड्रोन खरेदीसाठी मिळणार ८ लाख रुपये अनुदान!

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या अटी Yashwantrao Chavan Gharkul Yojana

१.लाभार्थी कुटुंब हे विमुक्त जाती व भटक्या जमाती या मुळ प्रवर्गातील असावे.
२.सदरचे कुटुंब हे गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारे असावे.
३.लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १.२० लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
४.लाभार्थी कुटुंबाचे स्वतःचे घर नसावे.
५.लाभार्थी कुटुंब हे अल्पभूधारक गटातील असावे.
६.अर्जदार कुटुंबाने या पूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
७.एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती सदर योजनेचा लाभ घेऊ शकतो.
८.यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही फक्त ग्रामीण भागासाठीच चालू आहे.

Yashwantrao Chavan Gharkul Yojana

यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आवश्यक कागदपत्रे (Documents)

१.तहसीलदार यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला
२.तहसीलदार यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला
३.तहसीलदार यांनी निर्गमित केलेले वय व अधिवास प्रमाणपत्र
४.जागेचा उतारा
५. ग्रामसभेचा ठराव
६.रेशन कार्ड
७.विस्तार अधिकारी यांचा स्थळ पाहणी अहवाल
८.मनरेगा जॉब कार्ड
९.राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
१०.मतदान कार्ड
११.आधार कार्ड
१२.तहसीलदार यांनी निर्गमित केलेला अल्पभूधारक दाखला
१३.१०० रुपयांच्या स्टॅम्प वर घरकुलाचा लाभ न घेतल्या बाबत प्रतिज्ञापत्र

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना(Yashwantrao Chavan Gharkul Yojana) समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येत आहे.सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे.या करिता Online Application करता येणार नाही.पात्र लाभार्थ्यांनी आपल्या ग्राम पंचायत कार्यालयाकडे किंवा पंचायत समिती कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.संपूर्ण अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह सदरचा अर्ज मा.गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे जमा करावयाचा आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना लाभाचे स्वरूप Yashwantrao Chavan Gharkul Yojana

१.सदर योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये 20 कुटूंबासाठी एक वसाहत निर्माण करणे. या वसाहतीस पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सेप्टींक टँकए गटारे व रस्ते अशा सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
२.ज्या लाभार्थ्यांकडे स्वत:ची जागा आहे आणि आजपर्यंत त्याने केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही आवास योजनेचा लाभ घेतला नाही,त्यास सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
३.ग्रामीण भागात पुरेशी जागा उपलब्ध होत असल्यास सामुहिकरित्या आणि जागा उपलब्ध होत नसल्यास वैयक्तीकरित्या सदर योजना राबविण्यात येणार आहे.
४.ग्रामीण भागातील प्रत्येक जिल्हयात सदरहू समाजाच्या लाभार्थ्यांना सामुहिकरित्या अथवा वैयक्तीकरित्या सदरहू योजनेचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना शासन निर्णययेथे क्लिक करा
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अर्ज PDFयेथे क्लिक करा

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कोणत्या समजसाठी राबविली जात आहे?

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांसाठी राबविण्यात येत आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत किती अनुदान मिळते?

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत डोंगराळ भागातील कुटुंबांना १.३० लाख तसेच सर्वसाधारण भागातील कुटुंबांना १.२० लाख रुपये अनुदान दिले जाते.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा?

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना साठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने ऑफलाईन पद्धतीनेच फॉर्म भरावा लागतो.

इतर योजने अंतर्गत घरकुल लाभ घेतल्यास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत पुन्हा लाभ घेता येतो का?

लाभार्थ्यांनी इतर घरकुल योजनेचा लाभ घेतला असल्यास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत लाभ घेता येत नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment