Agriculture Drone Scheme :- केंद्र सरकारची भन्नाट योजना,या योजनेच्या माध्यमातून ड्रोन खरेदीसाठी मिळणार 8 लाख रुपये अनुदान | ड्रोन अनुदान योजना

Spread the love

Agriculture Drone Scheme

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आजकाल तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टींवर नवनवीन शोध लागत आहेत.या तंत्रज्ञानामुळे मनुष्यबळ कमी लागत आहेत.कृषी क्षेत्रात देखील आता क्रांतिकारी बदल घडत आहेत.अनेक नवनवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रात देखील आपली कमाल दाखवत आहेत.शेतकऱ्यांना शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जाऊ लागला आहे.यामुळे मनुष्यबळ देखील कमी लागत आहे.

काय आहे योजना?
Agriculture Drone Scheme

केंद्र सरकारच्या माध्यमातून आता ड्रोन खरेदी साठी अनुदान दिले जाणार आहे.शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ड्रोनने फवारणी करावी या करिता ही योजना राबविण्यात येत आहे.या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात आले आहे. ड्रोन खरेदीसाठी महिला बचत गटांना या योजनेच्या माध्यमातून ८ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.

ही योजना २०२४-२०२६ या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरुवातीला संपूर्ण देशातील १५ हजार महिला बचत गटांना या योजनेच्या अंतर्गत ड्रोन खरेदीसाठी (Agriculture Drone Scheme)आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.जेणेकरून महिला बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाडे तत्वावर ड्रोन उपलब्ध करून देण्यात येतील.या मुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी फायदा होणार आहे तसेच त्यांच्या खर्चात आणि वेळेत बचत होईल.ही योजना फक्त महिला बचत गटांसाठीच सुरू करण्यात आली आहे.या योजनेसाठी केंद्र सरकारने १२६१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Agriculture Drone Scheme

केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या खत कंपन्या या योजनेकरीता जाहीर करण्यात आल्या आहेत त्यांच्या माध्यमातून महिला बचत गटांची निवड करण्यात येणार आहे.निवड झालेल्या महिला बचत गटांना ड्रोन(Agriculture Drone Scheme) प्रशिक्षण देण्यात येणार आहे.प्रशिक्षणाचा कालावधी १५ दिवसांचा असणार आहे.यामध्ये ५ दिवसांचे ड्रोन पायलट प्रशिक्षण अनिवार्य आहे तसेच १० दिवस कीटक नाशक फवारणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर,75 टक्के अनुदानावर गाय, म्हैस वाटप योजना सुरू!

अनुदानाची रक्कम किती असेल?

या योजनेच्या अंतर्गत महिला बचत गटांना जास्तीत जास्त ८० टक्के किंवा ८ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. कृषी वापरासाठी आवश्यक असलेल्या ड्रोनची किंमत मार्केट मध्ये सध्या १० लाख रुपये आहे.

ड्रोन फवारणीसाठी एकरी किती दर आहे?

आजच्या परिस्थितीमध्ये देशातील अनेक भागांमध्ये ड्रोनने शेतातील फवारणी केली जात आहे.त्यासाठी शेतकऱ्यांकडून एकरी ३०० ते ६०० रुपये भाडे आकारले जात आहे.

अर्ज कुठे करायचा?
Agriculture Drone Scheme

केंद्र सरकारच्या माध्यमातून ड्रोन खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच या योजनेकरीता १२६१ कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे.अद्याप या योजनेच्या विषयी सविस्तर मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत.या योजनेविषयी वेळोवेळी आपल्याला आमच्या वेबसाईट वर अपडेट दिले जाईल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment