Pashu Yojana|शेतकऱ्यांसाठी खुशखबर,गाय आणि म्हैस वाटप योजना सुरू,मिळणार 75 टक्के अनुदान,असा करा ऑनलाईन अर्ज! Apply Now Free

Spread the love

Pashu Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत २०२३-२४ या वर्षासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे सुरू आहे.याअंतर्गत ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे दिली जातात.जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पुढे येत आहेत.

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गायी व म्हशींचे वाटप करणे,शेळी-मेंढी गट वाटप करणे,१,००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणी अर्थसाहाय्य देणे,शंभर – कुक्कुट पिलांचे वाटप व २५ अधिक ३ – गट वाटप या योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी प्रक्रिया २०२३-२४ पासून राबविण्यात येत आहे.

पशुपालकांना डेअरी,पोल्ट्री किंवा शेळी पालन यापैकी ज्यासाठी अर्ज करावयाचा आहे,त्याची निवड करण्याची सुविधा आहे.अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी अर्ज करावे लागून नये,यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी २०२५-२६ पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे.

Pashu Yojana

हे पण वाचा:- शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून मिळणार तब्बल ४ लाख रुपये अनुदान!

काय आहे योजना?Pashu Yojana

जिल्हा परिषदेच्यापशुसंवर्धन विभागामार्फत ही योजना राबविली जाते.यात ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे दिली जातात.

पात्रतेचे निकष काय?

पशुपालनाचा अनुभव असावा.अल्प व अत्यल्प भूधारकांना प्राधान्य दिले जाते.आधार कार्ड आवश्यक आहे.७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावर मिळते.

ऑनलाइन अर्ज कोठे कराल?
Pashu Yojana Online Apply

महाबीएमएस ॲपवर अर्ज करता येईल.

कधीपर्यंत अर्ज करता येणार?

७ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करता येईल.दरवर्षी अर्ज करण्याची गरज नाही.एकदा अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांना दरवर्षी अर्ज करण्याची गरज नाही. प्रतीक्षा यादीनुसार क्रम लागत राहतो.जिल्ह्यात या योजनेचा लाभ पाचशेहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मार्फत सदरची योजना राबविली जात आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment