Reshim Sheti Anudan :- शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून मिळणार तब्बल 4 लाख रुपये अनुदान!

Spread the love

Reshim Sheti Anudan

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सदृढ करण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात. शेतकरी वर्ग स्वयंरोजगारीत व्हावा त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

काय आहे योजना?

शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळावे आणि त्या कामातून शेतकऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत रेशीम उद्योग विकास योजना राबविली जात आहे.या योजनेच्या माध्यमातून राज्यातील रेशीम उद्योगाला चालना देण्याचा सरकारचा मानस आहे.तसेच शेतकऱ्यांना देखील या योजनेचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा व्हावा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

रेशीम शेतीसाठी सरकारी योजना
Reshim Sheti Anudan

महाराष्ट्र राज्याच्या रेशीम उद्योग विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रेशीम उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.आपल्या राज्यातील काही भागांमधील हवामान रेशीम शेती करण्यासाठी पूरक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.तसेच रेशीम शेती उद्योग शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणारा आहे.या साठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अनुदान देखील दिले जाणार आहे.

हे पण वाचा:- आता विहिरीसाठी मिळणार ४ लाख रूपये अनुदान,तुमच्या मोबाईलवरून देखील ऑनलाईन अर्ज करता येणार!

तुती लागवडीसाठी विशेष अभियान

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग विकास योजना राबविली जात आहे.राज्यात २० डिसेंबर पर्यंत तुती लागवडीसाठी महा रेशीम अभियान राबविले जाणार आहे.तुती लागवडीसाठी आणि रेशीम उद्योगासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदान देखील दिले जाणार आहे.

किती अनुदान मिळते?
Reshim Sheti Anudan

महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्याला ३ वर्षांसाठी अनुदान दिले जाते.या योजनाच्या माध्यमातून ३ वर्षांकरिता एकूण ३ लाख ९७ हजार ३३५ रुपये अनुदान दिले जाणार आहे.

तुती लागवड आणि रेशीम कीटक संगोपन यांसाठी अनुदानाची रक्कम ही वेगवेगळी असणार आहे. शेतकऱ्यांना तुती लागवड करण्यासाठी १ लाख ६८ हजार १८६ रुपये तसेच रेशीम कीटक संगोपन करण्यासाठी शेड उभारण्याकरिता १ लाख ७९ हजार रुपये आणि साहित्य खरेदीसाठी ३२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.ही अनुदानाची रक्कम तीन वर्षांमध्ये विविध टप्प्यांमध्ये दिली जाते.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या रेशीम उद्योग विकास योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी आपले अर्ज करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

हे पण नक्की वाचा:- आता शेततळ्यासाठी मिळणार ३ लाख ३९ हजार रुपये अनुदान,जाणून घ्या सविस्तर माहिती!

योजनेसाठी आवश्यक पात्रता आणि कागदपत्रे
Reshim Sheti Anudan

•रेशीम उद्योग विकास योजना ही फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राबविली जात आहे.
आधार कार्ड
•पॅन कार्ड
•जॉब कार्ड
•बँक पासबुक झेरॉक्स
•पासपोर्ट आकाराचे फोटो
•ग्रामपंचायत ग्रामसभा मधील ठराव
•एका गावातून किमान ५ लाभार्थी असणे आवश्यक
•सात बारा आणि आठ अ उतारा
•जमिनीचा भूनकाशा
ही वरील कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक आहे.

अर्ज कुठे करायचा?
Reshim Sheti Anudan

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या रेशीम उद्योग विकास योजने साठी शेतकऱ्यांना आपल्या ग्राम पंचायत कार्यालयाकडे अर्ज करावा लागणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment