Bank Of India Poultry Loan :- बँक ऑफ इंडिया पोल्ट्री फार्म साठी देतेय कर्ज,तेही विनातारण! Apply Now

Spread the love

Bank Of India Poultry Loan

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.शेतीशी निगडित जोडधंद्यासाठी सरकार विविध योजना राबवित असते. त्यांच्या माध्यमातून गरजु व्यक्तींना उद्योग उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.त्याचबरोबर अनेक सरकारी,सहकारी,खाजगी बँका देखील शेतकऱ्यांना कृषी उद्योग उभारण्यासाठी कर्जाच्या स्वरूपात मदत करत असतात.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून बँक ऑफ इंडियाच्या मार्फत शेतकरी वर्गाला कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या विषयी माहिती जाणून घेणार आहेत.शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून विनातारण तसेच कमी व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

कर्जाची वैशिष्टये Bank Of India Poultry Loan

•बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला कमी व्याज दराने कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
•शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी १.६० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणत्याही प्रकारचे तारण बँकेला द्यावे लागणार नाही.
•१.६० लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्जाचा पुरवठा केला जातो.
•कुक्कुटपालन व्यवसायातील खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी देखील कर्ज पुरवठा केला जातो.
•तसेच विविध खरेदीसाठी देखील मुदत कर्ज आणि मागणी कर्जाचा पुरवठा केला जातो.

कशा कशासाठी कर्ज पुरवठा केला जातो?

•कृत्रिम उष्मायनाद्वारे कोंबडीच्या एक दिवसाच्या पिल्लांचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी किंवा हा व्यवसाय वाढीसाठी.
•मांस उत्पादन करणाऱ्या कुक्कुटपालन फॉर्मची स्थापना किंवा विस्तार करण्यासाठी कर्ज पुरवठा केला जातो.
•अंडी उत्पादन करणाऱ्या कुक्कुटपालन फॉर्मची स्थापना किंवा विस्तार करण्यासाठी कर्ज पुरवठा केला जातो.
•उत्पादन सह प्रक्रिया युनिट्सची स्थापना किंवा विस्तार करण्यासाठी.
•अंडी देणाऱ्या आणि मांस उत्पादन करणाऱ्या पालक पक्षांची पैदास किंवा शेती करण्यासाठी कर्ज पुरवठा केला जातो.

कर्ज घेण्यासाठी कोण कोण पात्र आहेत?

बँक ऑफ इंडियाच्या कुक्कुटपालन कर्ज घेण्यासाठी वैयक्तिक,SHGs/JLG ज्यामध्ये कुक्कुटपालन शेतकरी, सहकारी संस्था,कंपनी किंवा व्यक्तींची संघटना,भागीदारी संस्था,FPOs/FPCs यांना कर्ज पुरवठा बँकेच्या माध्यमातून केला जातो.

हे पण वाचा:- फक्त ५ मिनिटांत मिळवा कोटक महिंद्रा बँकेचे ५० हजार रुपयांचे पर्सनल लोन!

कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

•आधार कार्ड
•पॅन कार्ड
•बँक ऑफ इंडियाचे बँक पासबुक
•पासपोर्ट आकाराचे फोटो
•जमिनीचा सात बारा आणि आठ अ उतारा
•कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रशिक्षण घेतलेले प्रमाणपत्र
•कर्ज मर्यादा १.६० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास तारण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

अर्ज कुठे करायचा?

कुक्कुटपालन व्यवसायासाठी बँक ऑफ इंडियाचे कर्ज घ्यायचे असल्यास तुम्हाला तुमच्या जवळील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जाऊन सदर कर्जाविषयी माहिती घेऊन त्याच बँकेच्या शाखेत तुम्हाला कर्जासाठी अर्ज करावा लागेल.अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही बँक ऑफ इंडियाच्या हेल्पलाईन 1800 103 1906 या क्रमांकावर देखील कॉल करू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment