महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा,हवामान विभागाचा नवीन अंदाज | पंजाबराव डख हवामान अंदाज

Spread the love

पंजाबराव डख हवामान अंदाज
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे.त्यामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे.दुपारच्या वेळी प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे.राज्यात सध्या पावसाळा आणि हिवाळा असे दोन्ही मिळून हिवसाळा असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे.

मागील काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.हवामान विभागाच्या वतीने राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज सांगितला जात आहे.अशातच हवामान खात्याने दिलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होणार असल्याचे सांगितले आहे.

या ठिकाणी होऊ शकते गारपीट

राज्यात रविवारी कोकण,दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर,नंदुरबार,धुळे आणि नाशिक जिल्ह्यांत पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

हे पण वाचा:- आता विहिरीसाठी मिळणार ४ लाख रूपये,तुमच्या मोबाईलवरून देखील ऑनलाईन अर्ज करता येणार तेही मोफत!

हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार,उत्तर भारतात २६ नोव्हेंबर रोजी पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.शुक्रवारी कोकण, दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.शुक्रवारी विदर्भातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली. गोंदियात १५.६ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.

गारपीट होण्याचे कारण

पश्चिमेकडून येणारे थंड वारे आणि दक्षिणेकडून वेगाने येणारे बाष्पयुक्त वारे यांचा संयोग होऊन गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार,धुळे,जळगाव, नाशिकसह छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment