Magel Tyala Vihir Online Apply | आता विहीरीसाठी मिळणार 4 लाख रु.,तुमच्या मोबाईलवरून करता येणार ऑनलाईन अर्ज,आजच आपला अर्ज करा! Apply Now

Spread the love

Magel Tyala Vihir Online Apply

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे.मनरेगाच्या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या सिंचन विहीर,फळबाग लागवड आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

सिंचन विहिरीसाठी शासन निर्णय Vihir Yojana Maharashtra Apply Online

राज्य शासनाच्या माध्यमातून विहिरीसाठी ४ लाख रूपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे.तसा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे.लवकरच शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तरतूद उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती शासन निर्णयाद्वारे देण्यात आली होती.

आता याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन विहिरीच्या अनुदानासाठी,फळबाग लागवड साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शासनामार्फत एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.या ॲप्लिकेशन च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
Magel Tyala Vihir Online Apply

•आपल्याला हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील Google Play Store वरती जावे लागेल.

•तिथे गेल्यानंतर MAHA EGS Horticulture/Well App असे सर्च करायचे आहे.

•या ॲप्लिकेशनची लिंक आम्ही खाली देत आहोत.

•हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून इंस्टॉल करायचे आहे.

•आता हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर लाभार्थी लॉगिन आणि विभागाचे लॉगिन असे दोन पर्याय दिसतील.Magel Tyala Vihir Online Apply

•आपण अर्ज करण्यासाठी लाभार्थी लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

•पुढे आपल्यासमोर बागायती लागवड अर्ज,विहीर अर्ज आणि अर्जाची स्थिती असे तीन पर्याय दिसतील.

•सिंचन विहिरीसाठी अर्ज करण्यासाठी विहीर अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

•आपल्या समोर अर्ज ओपन होईल तिथे आपण आपले संपूर्ण नाव,मोबाईल क्रमांक,जिल्हा,तालुका,ग्रामपंचायत आणि आपले गाव निवडायचे आहे.

•त्यांनतर आपल्याकडे मनरेगाचे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.

•आता आपल्याला आपला मनरेगाचे जॉब कार्ड क्रमांक टाकायचा आहे.

•त्यानंतर मनरेगा जॉब कार्डचा फोटो किंवा पीडीएफ फाईल अपलोड करायची आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांनो रब्बी हंगामातील पिकांचा देखील १ रुपयात पीक विमा काढता येणार,ही आहे शेवटची तारीख !

•आता आपल्याला लाभार्थ्यांची वर्गवारी निवडायची आहे.जसे की अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,भटक्या जमाती, दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे इत्यादी.

•आपले ८अ प्रमाणे असणारे जमिनीचे एकूण क्षेत्र आणि जमिनीचा गट क्रमांक टाकायचा आहे.

•हे टाकून झाल्यानंतर आपल्या सात बारा आणि आठ अ उताऱ्याचा फोटो किंवा पीडीएफ फाईल अपलोड करायची आहे.

•आपल्याकडे सिंचन विहिरीचे बांधकामासाठी प्रस्तावित मजुरांचा जॉब कार्ड क्रमांक असल्यास हो या पर्यायावर क्लिक करायचे आहे.नसल्यास नाही या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

•अर्ज भरून झाल्यानंतर शेवटी पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

•आता आपल्यासमोर प्रपत्र-अ (संमतीपत्र) ओपन होईल ते पूर्ण वाचून पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

•आता आपल्या समोर प्रपत्र-ब ओपन होईल ते पूर्ण वाचून अर्ज जमा करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

•आता आपला अर्ज जमा करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून प्रस्तुत करा पर्यायावर क्लिक करायचे आहे.

•अशा प्रकारे आपण आपला अर्ज यशस्वीरीत्या जमा केला असा मेसेज आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसेल.

•आपण आपल्या अर्जाची स्थिती देखील चेक करू शकणार आहेत.

•त्यासाठी लाभार्थी लॉगिन वर क्लिक करून अर्जाची स्थिती या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.आपल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून आपण आपल्या अर्जाची स्थिती चेक करू शकणार आहेत.

सिंचन विहिरीसाठी(Magel Tyala Vihir Online Apply ) मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन MAHA EGS Horticulture/Well डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment