Vihir Yojana | जिल्ह्यातील प्रत्यके ग्रामपंचायतीला मिळणार 15 विहिरी,आजच आपल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज करा!

Spread the love

Vihir Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाइट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील ४० तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.या वर्षीच्या दुष्काळात सर्वसामान्य नागरिकांना रोजगार हमी योजनेतून रोजगार उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे.त्याकरिता या वर्षी रोहयोच्या माध्यमातून शासनाने राज्यात १० लाख विहिरी आणि सात लाख शेततळी उभारण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे.

यंदा सरासरी पाऊस कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नव्याने विहिरी घेण्यात येणार आहेत.पुणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात १५ विहिरी घेण्यात येणार आहेत.त्याकरिता आतापर्यंत ३६९ विहिरींची नोंदणी करण्यात आली आहे.जिल्ह्यात २० हजार विहिरींची नोंदणी अपेक्षित आहे.गटविकास अधिकारी कार्यारंभ आदेश देणार आहेत.चालू वर्षअखेर या कामांसाठी प्रशासकीय मान्यता घेऊन तातडीने कामे सुरू करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे.Vihir Yojana

रोजगार हमी योजनेंतर्गत विविध घटकांसाठी ही योजना आहे.महा-ईजीएस– हॉर्टिकल्चर या उपयोजनवर विहिरींसाठी नोंदणी करायची आहे.सध्या रोहयो अंतर्गत २१४ कामे सुरू असून,त्यामध्ये ८५१ मजूर काम करत आहेत.जिल्हा प्रशासनाकडे रोहयोसाठी तब्बल ९७ हजार ३७५ जॉब कार्ड सक्रिय आहेत.प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये १५ विहिरी घेण्यात येणार आहेत.

हे पण वाचा:- मागेल त्याला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू,शेततळे,ठिबक/तुषार सिंचन, फळबाग साठी करता येणार अर्ज!

पुढील वर्ष निवडणुकांचे असल्याने डिसेंबरअखेर या कामांसाठी प्रशासकीय मान्यता घेऊन कामे सुरू करण्यात येणार आहेत,अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त,दारिद्र्य रेषेखालील कुटुंब,स्त्री किंवा दिव्यांग कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे,पाच एकरपर्यंत क्षेत्र असलेल्या कुटुंबांसाठी ही योजना आहे,अशी माहिती रोहयोच्या उपजिल्हाधिकारी दिप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी दिली.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment