Magel Tyala Yojana:- छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना,मागेल त्याला योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू,असा करा अर्ज!Apply Now

Spread the love

Magel Tyala Yojana

नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे दिला जाणार आहे.आर्थिक वर्ष २०२३-२४ याकरिता राज्य शासनाने शेतकऱ्यांना मागेल त्याला योजना (Magel Tyala Yojana) सुरू केली आहे.याच योजनेला छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना असे नाव देण्यात आले आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फळबाग लागवड, ठिबक/तुषार सिंचन,शेततळे,शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट,हरितगृह,आधुनिक पेरणीयंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर मशीन हे घटक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या करिता राज्य शासनाने १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे.

हे पण वाचा:- राज्यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना जाहीर!

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे Magel Tyala Yojana

यासाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना जमिनीचा सातबारा उतारा,आधार कार्ड,पॅन कार्ड आणि बँक पासबुक तसेच पासपोर्ट आकाराचे फोटो यांसारख्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर अर्जांची पडताळणी होऊन अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. ज्या शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारले जातील अशा शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

•अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करा.त्यासाठी येथे क्लिक करा
•”मागेल त्याला योजना” या ऑप्शनवर क्लिक करा.
•तुम्हाला ज्या घटकाचा लाभ घ्यावयाचा आहे तो घटक निवडा.
•अर्जामध्ये आवश्यक असणारी माहिती भरा.
•आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
•अर्ज सबमिट करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment