शेतकऱ्यांसाठी खुशखबर,पीएम किसान योजनेच्या रकमेत होणार वाढ,6 हजार ऐवजी मिळणार 8 हजार रुपये| PM Kisan Yojana Update

Spread the love

PM Kisan Yojana Update
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकार एक खुशखबर देणार आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी २०२४ रोजी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. त्यांचा हा सलग सहावा अर्थसंकल्प असेल.यात शेतकऱ्यांना दिला जाणारा सन्मान निधी दोन हजारांनी वाढविला जाण्याची शक्यता आहे.

सध्या या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात.ही रक्कम वाढवून ८ हजार केली जाऊ शकते. सध्या सन्मान निधी वर्षभरात तीन हफ्त्यांमध्ये दिला जातो.दर चार महिन्यांनी २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात.मोदी सरकारच्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात या सन्मान निधीचा १५ वा हप्ता जमा केला होता.PM Kisan Yojana Update

केंद्र सरकारची ही सर्वात मोठी योजना आहे.१ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू करण्यात आली. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीत वाढ केली जावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.

हे पण वाचा:- मागेल त्या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, शेततळे,ठिबक/तुषार सिंचन,फळबाग साठी करता येणार ऑनलाईन अर्ज!

आता पर्यंत एवढ्या शेतकऱ्यांनी घेतला लाभ

केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना २०१८ पासून सबंध देशभर सुरू करण्यात आली.या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत ११ कोटी कुटुंबांना लाभ देण्यात आला आहे.तसेच २.६० लाख कोटी रुपयांचा निधी या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत वितरित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यात २०१८-१९ या वर्षी ४,३६,८१५ शेतकऱ्यांनी लाभ घेतला.२०१९-२० या वर्षी ४८,९८,८०६ लाभार्थी, २०२०-२१ या वर्षी ६६,७१,८०१ लाभार्थी, २०२१-२२ या वर्षी ६४,३१,३८४ लाभार्थी,२०२२-२३ या वर्षी ५६,५४,६२५ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment