Rabi Pik Vima 2023 :- शेतकऱ्यांनो रबी पीकांचा पीक विमा १ रुपयात काढता येणार,ही आहे शेवटची तारीख!

Spread the love

Rabi Pik Vima 2023

नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.यंदा खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त १ रुपये प्रीमियम रक्कम भरावी लागली होती.आता रबी हंगामातील पिकांचा देखील विमा काढण्यासाठी देखील फक्त १ रुपया प्रीमियम रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.

१ रुपयात पीक विमा योजना राबविल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.चालू रबी हंगामातील पिकांचा देखील पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदवावा,असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.

या पिकांचा असेल समावेश

रब्बी हंगाम २०२३-२४ या पीक हंगामाकरिता रब्बी ज्वारी(जिरायती/बागायती),बागायती गहू,हरभरा,रब्बी कांदा,उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग या सहा पिकांचा समावेश करण्यात आला आहे.शेतकऱ्यांना फक्त १ रुपयात या योजनेत सहभागी होता येणार आहे.

हे पण वाचा:- महिला बचत गटांना १०० टक्के अनुदानावर १० शेळी आणि १ बोकड गट वाटप योजनेत नवे बदल!

शेवटची मुदत Rabi Pik Vima 2023

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत रबी हंगामातील रब्बी ज्वारी(जिरायत व बागायत) साठी पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ही ३० नोव्हेंबर २०२३ असणार आहे.गहू (बागायती),हरभरा आणि रब्बी कांदा या पिकासाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२३ पर्यंत असणार आहे.तसेच उन्हाळी भुईमूग व उन्हाळी भात या पिकांकरिता पीक विम्याची शेवटची मुदत ३१ मार्च २०२४ असणार आहे.

कुठे अर्ज करायचा?

शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांचा पीक विमा उतरविण्यासाठी पीएमएफबीवाय (PMFBY) या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करायचा आहे.शेतकरी १ रुपयात स्वतः,विमा कंपनी प्रतिनिधी किंवा ग्राहक सेवा केंद्र यांच्या माध्यमातून पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहे.शेतकऱ्यांची उर्वरित प्रीमियम रक्कम ही राज्य शासनाच्या मार्फत विमा कंपनीला भरण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा एक फॉर्म भरण्यासाठी ग्राहक सेवा केंद्र चालकाला पीक विमा कंपनीकडून ४० रुपये देण्यात येतात.जे शेतकरी बँकेचे पीक कर्जदार असतील अशा शेतकऱ्यांनी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी व्हावे.जर बँकेने अशा कर्जदार शेतकऱ्यांचा पीक विमा भरला नाही तर शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पिकांचा विमा या योजनेच्या अंतर्गत भरावा.

पीक विमा(Rabi Pik Vima 2023) फॉर्म भरण्यास शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास किंवा ग्राहक सेवा केंद्र चालकाने जास्त पैशाची मागणी केल्यास पीक विमा कंपनी कार्यालय,तहसीलदार/तालुका कृषी अधिकारी,जिल्हाधिकारी/जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

जिल्हानिहाय पीक विमा कंपनी आणि समाविष्ट जिल्हे

विमा कंपनीसमविष्ट जिल्हे
ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि.अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा
चोलामंडलम एम. एस. जनरल इं. कं. लि.छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि.नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
युनिव्हर्सल सोम्पो जनरल इं. कं. लि.जालना, गोंदिया, कोल्हापूर
आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंशुरन्स कं.लि.परभणी, वर्धा, नागपूर
भारतीय कृषी विमा कंपनीवाशिम, बुलडाणा, सांगली, नंदूरबार, बीड
रिलायन्स जनरल इन्शुरन्सयवतमाळ, अमरावती, गडचिरोली

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment