Sheli Gat Vatap Yojana:- महिला बचत गटांना 100 टक्के अनुदानावर 10 शेळी आणि 1 बोकड वाटप योजनेत नवे बदल!

Spread the love

Sheli Gat Vatap Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आदिवासी बांधवांची उपजीविका पावसावर आधारित शेती असल्यामुळे प्रत्येक वर्षी शेतीच्या माध्यमातून निश्चित उत्पन्न मिळेल याची हमी नसते.शेतीबरोबरच शेतीशी निगडित शेळीपालन हा जोडधंदा केल्यास त्यांना निश्चित उत्पन्नाची हमी मिळू शकेल.याकरिता महाराष्ट्र राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत राज्यातील आदिवासी भागातील महिला बचत गटांना १०० टक्के अनुदानावर १० शेळी आणि १ बोकड गट वाटप योजना राबविण्यात येत आहे.

योजनेचे उद्दिष्ट्ये Sheli Gat Vatap Yojana

महाराष्ट्र राज्य सरकारच्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी भागातील महिला बचत गटांना १० शेळी आणि १ बोकड गटाचे वाटप करण्यात येते.शेळीपालनच्या माध्यमातून महिला बचत गटांचे उत्पन्न वाढून बचत गटांचे बळकटीकरण करणे तसेच आदिवासी भागातील महिलांचे स्थलांतर कमी करणे हा योजनेच्या मागील मुख्य उद्देश आहे.यासाठी राज्य सरकारने ५०० लक्ष एवढ्या निधीची तरतूद केली आहे.

योजनेतील लाभार्थी/युनिट संख्या

या योजनेच्या माध्यमातून एकूण ४८२ लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत होता परंतु आता नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार निवड झालेल्या लाभार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या शेळीगटांच्या (उस्मानाबादी/संगमनेरी अथवा स्थानिक) जातींना अनुज्ञेय असणाऱ्या रक्कमेवर लाभार्थी संख्या ठरेल.तथापि लाभार्थी संख्या ४८२ पेक्षा कमी नसेल.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी शेळी मेंढी,दुधाळ गाई म्हशी,कुक्कुटपालन साठी ऑनलाईन अर्ज सुरू!

शेळी खरेदीसाठी देण्यात येणारे अनुदान

उस्मानाबादी/संगमनेरी जातीच्या पैदास सक्षम शेळ्या खरेदी करण्यासाठी प्रती शेळी ८०००/- रुपये तसेच १० शेळ्यांसाठी ८० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.तसेच स्थानिक जातीच्या पैदास सक्षम शेळ्यांसाठी ६०००/- रुपये प्रती शेळी म्हणजे १० शेळ्यांसाठी ६० हजार रुपये अनुदान वितरीत केले जाणार आहे.

बोकड खरेदीसाठी दिले जाणारे अनुदान

उस्मानाबादी/संगमनेरी जातीच्या एक नर बोकडसाठी १० हजार रुपये तसेच स्थानिक जातीच्या नर बोकडसाठी ८ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.तसेच उस्मानाबादी/संगमनेरी जातीच्या १० शेळ्यांचा ३ वर्षांचा विमा उतरविण्यासाठी १३,५४५/- रुपये आणि अन्य स्थानिक जातीच्या १० शेळ्यांचा विमा उतरविण्यासाठी १०,२३१/- रुपये अनुदान दिले जाणार आहे.

योजना राबविण्याची कार्यपद्धती मध्ये झालेले बदल

लाभार्थ्यांकडून उस्मानाबादी/संगमनेरी जातीच्या पैदाससक्षम शेळ्या/बोकडाची खरेदी प्राधान्याने अधिकृत बाजारातुनच करण्यात यावी.शेळी गटाचा विमा स्थानिक कंपनीकडून प्रकल्प अधिकारी यांचे नावे काढण्यात यावा व सहअर्जदार म्हणून लाभार्थी यांचे नाव लावण्यात यावे.

सर्व लाभार्थ्यांकरिता शेळीगटाची(Sheli Gat Vatap Yojana) खरेदी एकाच वेळी करणे शक्य नसल्यास किमान एका प्रकल्प कार्यालयातील लाभार्थ्यांकरिता शेळी गटाची खरेदी एकाचवेळी करण्यात यावी व तेही शक्य नसल्यास तालुकानिहाय शेळीगट खरेदी करण्यात यावेत.शेळी गटाची खरेदी केल्यानंतर खरेदी केलेल्या ठिकाणाहून लाभार्थ्यांनी स्वखर्चाने वाहतूक करावयाची आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment