संपूर्ण देशात नोटबंदी झाल्यानंतर ऑनलाईन व्यवहार करण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे.फोन पे,गूगल पे तसेच पेटीएम सारख्या यूपीआय ॲप्लिकेशनच्या मधायमातून ऑनलाईन पेमेंट केले जात आहे.UPI सुविधेमुळे ऑनलाईन व्यवहार करणे खूप सोपे झाले आहे. परंतु नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) ने युपीआय वापर कर्त्यांसाठी काही निर्बंध घातले आहेत.
ज्या खातेदारांनी १ जानेवारी २०२३ पासून ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये आपल्या UPI आयडीच्या मध्यमातून म्हणजेच फोन पे,गूगल पे तसेच पेटीएम सारख्या यूपीआय ॲप्लिकेशनच्या माध्यमातून एकही व्यवहार केला नसेल अशा व्यक्तींचे UPI आयडी बंद करण्यात येणार आहेत.तशा नवीन गाईडलाईन्स NPCI ने जारी केल्या आहेत.
त्यामुळे ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी आपण आपल्या UPI आय वरून कमीत कमी एक तरी व्यवहार करणे आवश्यक आहे नाहीतर आपला UPI आयडी बंद करण्यात येणार आहे.तुमचा UPI आयडी बंद करण्यापूर्वी बँकेकडून तुम्हाला मेसेज किंवा ई मेल केला जाईल.ज्यामधे तुम्हाला तुमचा UPI आयडी कधीपासून निष्क्रिय केला जाणार आहे याची माहिती कळणार आहे.
तुम्हाला अशा प्रकारचा ई मेल किंवा मेसेज आला तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.तुम्हाला तुमचा UPI आयडी पुन्हा सक्रिय करायचा असल्यास तुम्ही तुमच्या UPI आयडीच्या माध्यमातून किमान एक तरी व्यवहार करणे आवश्यक आहे.जेणेकरून तुमचा UPI आयडी निष्क्रिय केला जाणार नाही.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.