UPI Changes:- 1 जानेवारी पासून फोन पे,गूगल पे यासारख्या यूपीआय ॲप्लिकेशन मध्ये होणार 9 महत्त्वाचे बदल,तुमच्या खिशावर काय परिणाम होणार जाणून घ्या!

Spread the love

UPI Payment Rule Changes in 2024
UPI च्या माध्यमातून जसे की फोन पे,गूगल पे, पेटीएम यांसारख्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी आता ग्राहकांना टॅप अँड पेची सुविधा मिळणार आहे.या सुविधेमुळे पेमेंट मशीनने मोबाईलला स्पर्श केल्यावर आपोआप पेमेंट होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्याची प्रक्रिया केली जात आहे.३१ जानेवारी २०२४ पासून ही सेवा उपलब्ध केली जाईल.तसेच आरबीआयने NPCI च्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधांमध्ये १ जानेवारी पासून काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत.

अलीकडे देशातील यूपीआय वापरकर्त्यांची संख्या वाढलेली आहे.सध्या भारतात एकूण ४० कोटी यूपीआय वापरकर्ते आहेत. यूपीआय वापरकर्त्यांच्या माध्यमातून या वर्षी १६ लाख कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत.तसेच सायबर गुन्हेगारीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०२३ या संपूर्ण वर्षात ३० हजार कोटी रुपये सायबर गुन्ह्यातून यूपीआयच्या द्वारे चोरी गेले आहेत.तसेच येत्या ३ वर्षांच्या काळात यूपीआय वापरकर्त्यांची संख्या अजून वाढणार असल्याची शक्यता आहे आणि व्यवहारांची संख्या १०० बिलियन डॉलर्स जाण्याचा अंदाज आहे.त्यामुळे सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरबीआयने यूपीआय पेमेंट साठी काही नियम आणखी कठोर केले आहेत.

आरबीआय ने केलेले ९ महत्त्वाचे बदल
UPI Payment Rule Changes in 2024

•ज्या ग्राहकांनी फोन पे,गूगल पे किंवा पेटीएम सारखे यू पी आय ॲप्लिकेशन सुरू केले असेल आणि जानेवारी ते डिसेंबर या कालावधी दरम्यान त्या माध्यमातून एक ही व्यवहार केला नसेल तर असे यूपीआय आयडी सुरक्षेच्या कारणास्तव बंद केले जाणार आहेत.

•यूपीआय वापरकर्त्यांसाठी व्यवहार करण्याची दैनंदिन मर्यादा ही १ लाख रुपयांपर्यंत असणार आहे.

हे पण वाचा:- ३१ डिसेंबर पर्यंत ही ५ सरकारी कामे उरकून घ्या नाहीतर होईल आर्थिक नुकसान, येईल पश्र्चातापाची वेळ!

•शैक्षणिक संस्थांची फी किंवा रुग्णालयाची फी भरण्यासाठी यूपीआयच्या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंत मर्यादा देण्यात आली आहे.

•आता २ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम यूपीआयच्या माध्यमातून पाठविल्यास ती जमा होण्यासाठी ४ तास लागणार आहेत.सायबर गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.त्यामुळे आता २ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असल्यास ती दुकानदाराच्या अकाऊंटला चार तासांनी जमा होणार आहे.परंतु तुम्ही एखाद्या व्यक्तीला नेहमीच पेमेंट करत असाल तर हा नियम तुम्हाला लागू होत नाही.

•यूपीआय ॲप्लिकेशन द्वारे तुम्ही केलेले पेमेंट चार तासांच्या आत कॅन्सल करू शकणार आहेत.तसेच ती रक्कम तुमच्या खात्यावर पुन्हा जमा होणार आहे.सायबर गुन्हेगारीतून चोरी झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी आणि चुकून दुसऱ्या कोणाच्या खात्यावर पैसे गेल्यास परत मिळवण्यासाठी याचा खूप फायदा होणार आहे.

•आता यूपीआय पेमेंट सिस्टम वापरणाऱ्या व्यक्तीचे खरे नाव समोर येणार आहे.त्यामुळे सिमकार्ड कोणाच्याही नावावर असले तरी देखील बँक खाते ज्या व्यक्तीच्या नावाने आहे त्या व्यक्तीचे नाव पेमेंट करताना दिसणार आहे.

•आता तुम्हाला बँकेकडून ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळणार आहे.त्यामुळे तुम्ही बँकेतील शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकणार आहेत.यासाठी बँकेकडून तुमचे ट्रॅक रेकॉर्ड आणि सिबील स्कोर चेक केला जाईल.

•आता एटीएम मशीन मधून क्यूआर चा वापर करून पैसे काढता येणार आहेत.यासाठी आरबीआयने जपानच्या हिताशी कंपनी सोबत करार केला आहे.त्यामुळे ही सुविधा देखील जानेवारी महिन्याच्या शेवटी उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

•इथून पुढे यूपीआय वॉलेटच्या माध्यमातून पेमेंट केल्यास १.१ टक्के सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment