31 डिसेंबर पर्यंत ही 5 सरकारी कामे उरकून घ्या नाहीतर होईल आर्थिक नुकसान,येईल पश्र्चातापाची वेळ!

Spread the love

नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.२०२३ हे वर्ष संपत आले आहे.डिसेंबर महिन्याचे काही शेवटचेच दिवस बाकी राहिलेले आहेत.आज या लेखाच्या माध्यमातून अशी ५ कामे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी तुम्हाला या महिन्याच्या ३१ तारखेच्या आत उरकून घ्यायची आहेत. नाहीतर आपले आर्थिक नुकसान होऊ शकते.

१.जर आपले स्टेट बॅक ऑफ इंडिया (State Bank Of India) मध्ये खाते असेल तर एसबीआयच्या माध्यमातून त्यांच्या ग्राहकांसाठी SBI अमृत कलश ही योजना राबविली जात आहे.या योजनेच्या अंतर्गत फिक्स्ड डीपॉझिट साठी ४०० दिवस मुदतीसाठी FD करणाऱ्या ग्राहकांना ७.२०% एवढा व्याजदर दिला जाणार आहे.त्यासाठी FD करण्याची अंतिम मुदत ही ३१ डिसेंबर २०२३ असणार आहे.तसेच या एफडीच्या डीपॉझिटवर मिळणारे व्याज टीडीएस कापून ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.

२.आपण कोणत्याही बँकेत लॉकर घेतले असेल सदर लॉकर साठीचा करार ३१ डिसेंबर रोजी संपणार आहेत. आपल्याला जर हा करार पुढे चालू ठेवायचा असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आपल्या संबंधित बँकेत जाऊन करार वाढवण्यासाठी स्वाक्षरी करावी लागणार आहे.आपण असे न केल्यास आपल्याला बँकेचे लॉकर सोडावे लागणार आहे.

हे पण वाचा:- लग्न झालंय पण मॅरेज सर्टिफिकेट बनवलं नाही, भविष्यात येऊ शकते अडचण!

३.डिजिटल युगाच्या काळामध्ये अनेक नागरिक Phone Pay,Google Pay,Amazon Pay आणि Paytm यांसारख्या विविध UPI ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करीत असतात.परंतु NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI वापराबद्दल एक नवीन निर्णय घेतला आहे.ज्या UPI खात्यात मागील एक वर्षांपासून कोणतेही व्यवहार झाले नाहीत तसेच जी UPI खाती एक वर्षांपासून निष्क्रिय आहेत अशी UPI खाते बंद केली जाणार आहेत.त्याची अंतिम मुदत ही ३१ डिसेंबर २०२३ असणार आहे.त्यामुळे आपले UPI खाते मागील १ वर्षांपासून निष्क्रिय असेल तर आपल्याला ते सक्रिय करावे लागणार आहे.

४.भारतातील आयकर भरणाऱ्या व्यक्तींसाठी आपला आयकर परतावा भरण्याची अंतिम मुदत ही ३१ जुलै २०२३ होती.आपले उत्पन्न आणि आर्थिक स्थितीची माहिती आयकर विभागाला प्राप्तिकरच्या माध्यमातून द्यावी लागते.त्यासाठी आपल्याला ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत विलंब शुल्कासह आयकर परतावा भरता येणार आहे. आपल्याला विलंब शुल्कापोटी ५,००,००० रुपये उत्पन्न असेल तर ५००० रुपये द्यावे लागणार आहेत.

५.आपण जर म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली असेल तर आपल्याला त्यासाठी नामांकन करावे लागते.म्हणजेच आपल्याला आपल्या पश्चात असणाऱ्या वारसाची नोंद करावी लागते.त्यासाठी तुम्हाला यासाठी नामांकन करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ ही अंतिम मुदत असणार आहे.नाहीतर आपले म्युच्युअल फंडाचे खाते गोठवले जाऊ शकते.

आपल्याला वरती नमूद केलेली कामे ३१ डिसेंबर २०२३ च्या आत उरकून घेणे आवश्यक आहे.नाहीतर तुम्हाला आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment