Namo Shetkari Yojana 2nd Installment
केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांसाठी 2019 साली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे.2019 साली अर्थसंकल्पात ही योजना सुरू केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.शेतकऱ्यांमध्ये या योजनेच्या विषयी खूप आकर्षण आहे.तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविली जाणारी ही एक सर्वात मोठी DBT योजना आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना म्हणजेच शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांच्या निधीचे वितरण केले जाते.या निधीचे वितरण तीन हप्तांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे केले जाते.हप्त्याची रक्कम DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा केली जाते.
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आतापर्यंत 30 हजार रुपयांचे 15 हप्त्यांमध्ये वितरण करण्यात आले आहेत.तसेच या योजनेचा पुढील 16वा हप्ता देखील फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट नुसार समोर आली आहे.
केंद्र सरकारच्या या योजनेची शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता पाहून महाराष्ट्र राज्य सरकारने देखील याच योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ देखील पीएम किसान योजने सारखाच आहे.
नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देखील पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वितरण केले जाणार आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला आले त्यावेळी त्यांच्या हस्ते पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते.त्यामुळे दुसऱ्या हप्त्याचे वितरण कधी केले जाणार असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.
नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी (Namo Shetkari Yojana 2nd Installment) 1792 कोटी रुपयांची विशेष आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली आहे.अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पेज वरून दिली आहे.
त्यामुळे या महिन्यातील शेवटच्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो.तसेच पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता देखील 28 फेब्रुवारी रोजी जमा केला जाणार आहे.
कदाचित दोन्ही योजनांचे पैसे एकाच दिवशी शेतकऱ्यांना मिळतील असा दावा मीडियाने केला आहे.सरकारच्या वतीने कुठेही या बातमीला दुजोरा देण्यात आलेला नाही तसेच कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.(Namo Shetkari Yojana 2nd Installment)
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला वेळोवेळी भेट देत रहा.