फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पीएम किसानचे 6000 रुपये,यादीत तुमचे नाव आहे का?PM Kisan

Spread the love

PM Kisan Yojana:- केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पी एम किसान योजनेतून वार्षिक सहा हजार रुपयांचे वितरण केले जाते.परंतु अलीकडेच केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आपले पी एम किसान योजनेचे खाते किसान क्रेडिट कार्डशी लिंक करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.यासाठी सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

यासाठी आपल्या भागातील कृषी समन्वयक किंवा ग्राहक सेवा केंद्रावर तुम्हाला संपर्क साधावा लागणार आहे.दोन्ही योजना लिंक करणे खूप आवश्यक असणार आहे.तसेच शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी करून घेणे देखील खूप महत्त्वाचे असणार आहे.जर शेतकऱ्यांनी आपली के वायसी अपडेट केली नाही तर त्यांना वर्षाला मिळणाऱ्या 6000 हजार रुपयांच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.केंद्र सरकारच्या वतीने हे नियम अगदी कडक करण्यात आले आहेत.तसेच यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नव्हती त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्जाचा फायदा

किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्जाचा फायदा देण्यात येतो.शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत 1.60 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज विना तारण घेता येते.तसेच या कर्जाची वेळेत परतफेड केल्यास शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दर आकारला जातो.

पीएम किसान योजनेतील सर्वच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.परंतु सध्या अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड योजनेपासून वंचित आहेत.त्यामुळे केंद्र सरकारने पीएम किसान च्या सर्वच शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे ज्या पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही अशा शेतकऱ्यांनी अर्ज करून दोन्ही योजना लिंकिंग करून घेणे गरजेचे आहे.

कधी जमा होणार पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता?

देशातील पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 15 हप्त्यांचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे.आता पर्यंत या योजनेच्या लाभापोटी प्रती लाभार्थ्यास 30 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.मीडिया रिपोर्ट आणि खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा पुढील 16वा हप्ता फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो.परंतु केंद्र सरकारकडून तशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

डायरेक्ट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाभ

पीएम किसान योजनेच्या पारदर्शकतेसाठी एकाच वेळी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून लाभाची रक्कम जमा केली जाते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.

हे पण वाचा:- 30 हजार रुपये मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर,यादीत तुमचे नाव आहे की नाही चेक करा!

Leave a comment