Xerox Machine Subsidy:- समाजकल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय लाभार्थी, दिव्यांग व्यक्तीसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.त्याचाच एक भाग म्हणून १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन(Xerox Machine Subsidy),शिलाई मशीन वाटप केली जाते. त्यासाठी गरजूंनी ३१ मार्चपर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे.
Table of Contents
दिव्यांग व्यक्ती,मागासवर्गीय लाभाचींची सामाजिक, आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात, याच धर्तीवर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातर्फ १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन,शिलाई मशीनसाठी अनुदान मिळते.
लाभार्थ्यांनी झेरॉक्स,शिलाई मशीन विकत घेऊन त्याद्वारे स्वतःचा व्यवसाय सुरू करावा,त्यातून आपली प्रगती साधावी,हा शासन,प्रशासनाचा हेतू आहे.या योजनेसाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जालना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
झेरॉक्स मशीनसाठी १००टक्के अनुदान Xerox Machine Subsidy
झेरॉक्स मशीन घेऊन कोठेही व्यवसाय सुरू करता येतो. दिव्यांग व्यक्तींनाही हा व्यवसाय करणे सहज शक्य होते. यामुळे दिव्यांग व्यक्ती,मागासवर्गीयांसाठी १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीनचे वाटप होते.
शिलाई मशीनसाठी १००टक्के अनुदान
सिलाई मशीन घेऊनही लाभार्थी महिला,पुरुष आपला व्यवसाय सुरू करू शकतात.या शिलाई मशीनसाठी ही जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने १०० टक्के अनुदान दिले जाते.
लाभासाठी निकष काय आहेत?
लाभार्थी मागासवर्गीय किंवा दिव्यांग असावा.लाभार्थ्यांचे वय१८ ते ६० वर्षातील असणे गरजेचे आहे.वार्षिक उत्पन एक लाखाच्या आत असणेही गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
जातीचा दाखला
दिव्यांग प्रमाणपत्र
आधार कार्ड
पॅन कार्ड
रहिवासी दाखला
ग्रामसभेचा ठराव
शाळा सोडल्याचा दाखला
जालना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी आवाहन केले आहे की,गरजू व्यक्तींनी वेळेत अर्ज करून १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स आणि शिलाई मशीनचा लाभ घ्यावा.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.