38 हजार रुपये मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर, यादीत तुमचे नाव आहे की नाही चेक करा!PM Kisan and Namo Shetkari Yojana Benefit

Spread the love

PM Kisan and Namo Shetkari Yojana Benefit प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.या योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक तीन टप्प्यांमध्ये सहा हजार रुपये डायरेक्ट बँक खात्यात जमा केले जातात.

शेतकऱ्यांमध्ये देखील या योजनेविषयी प्रचंड आकर्षण आहे.शेतकऱ्यांना चांगले जीवनमान मिळावे तसेच त्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपयांचे वितरण केले जाते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून २०२३-२४ या आर्थिक वर्षात नऊ कोटी साठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १६ हप्त्यांचे वितरण करण्यात आले आहे.

त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत प्रती शेतकरी एकूण ३२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.२८ फेब्रुवारी रोजी या योजनेचा १६वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टल देखील सुरू केले आहे.तिथे शेतकरी मिळणाऱ्या लाभाविषयी माहिती घेऊ शकणार आहेत.या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना गावाची यादी तसेच आतापर्यंत किती हप्त्यांचा लाभ मिळाला याची माहिती मिळणार आहे.

तसेच महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून देखील पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे.या योजनेच्या माध्यमातून देखील पीएम किसान योजनेसाठी पात्र असलेले सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये वितरित करण्यात येणार आहेत.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर,या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच दिवशी जमा होणार 6000 रुपये,शेतकऱ्यांची यादी जाहीर,यादीत तुमचे नाव आहे का?येथे चेक करा!

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरित करण्यात आलेला होता.तसेच या योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता २८ फेब्रुवारी रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नरेंद्र मोदींच्या हस्ते यवतमाळ या ठिकाणाहून वितरित करण्यात आलेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत ६००० रुपयांचा लाभ मिळालेला आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अंतर्गत १६ हप्त्यांमध्ये ३२ हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तीन हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये असे मिळून ३८ हजार रुपये वितरित करण्यात आलेले आहेत.PM Kisan and Namo Shetkari Yojana Benefit

तुम्हाला देखील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत किती हप्त्यांचे वितरण झाले आहे याची माहिती मिळणार आहे.PM Kisan and Namo Shetkari Yojana Benefit

तुम्हाला आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून किती पैसे मिळाले याची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.PM Kisan and Namo Shetkari Yojana Benefit

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत किती पैसे मिळाले हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.

Leave a comment