Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana
नमस्कार शेतकरी बंधूंनो आम्ही दररोज आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून नवनवीन माहिती जसे की शेतकरी योजना,सरकारी योजनांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो.आज आपण महाराष्ट्र राज्य शासनाच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती जाऊन घेणार आहोत.दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना असे या योजनेचे नाव आहे.चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाऊन घेऊयात.
Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana
काय आहे दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना?
सदर योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविली जाते.राज्यातील मोलमजुरी करून जगणारे आणि भूमिहीन शेतमजूर तसेच ज्या नागरिकांकडे शेती नाही अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.राज्यातील अशा लोकांना एक उत्पन्नाचे साधन निर्माण करून देणे आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी शासनाकडून अगोदर 50% अनुदान दिले जात होते परंतु आता त्याची मर्यादा वाढवून 100% करण्यात आली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.
किती एकर जमीन खरेदीसाठी मिळेल अनुदान?
सरकारने सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना जमीन खरेदीसाठी काही मर्यादा घातल्या आहेत.या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 02 एकर बागायती शेती किंवा 04 एकर जिरायती शेती खरेदी करता येणार आहे.
किती रुपये अनुदान मिळेल?
सदर योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 02 एकर बागायती शेती खरेदीसाठी कमाल 16 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.तसेच 04 एकर जिरायती शेती खरेदी करण्यासाठी 30 लाख रुपये अनुदान या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत.
दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना आवश्यक कागदपत्रे
1)आधार कार्ड
2)मतदान कार्ड
3)रेशन कार्ड
4)बँकेच्या पासबुक ची झेरॉक्स
5)गाव कामगार तलाठी यांचा रहिवाशी दाखला
6)तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला
7)अर्जदार जर दारिद्र्य रेषेखालील असल्यास दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
8)चालू मोबाईल नंबर
9)ईमेल आयडी
10)पासपोर्ट साइज आकाराचे पाच फोटो
11)अर्जदार भूमिहीन शेतमजूर असल्याचा तहसीलदार यांचा दाखला
12)अर्जदार अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास उपविभागीय अधिकारी यांचा जातीचा दाखला.
दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करावा?
1.या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता नागरिकांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा झाल्यास नागरिकांना संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागातील समाज कल्याण आयुक्त यांच्याकडे अर्ज करावा लागेल.
2.संबंधित विभागाकडून नागरिकांना अर्ज उपलब्ध करून दिला जाईल. सदर अर्ज भरून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे या अर्जासोबत जोडून तो जमा करावयाचा आहे.
3.अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. येथे क्लिक करा
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा. 🙏