Majhi Kanya Bhagyashree Yojana
Majhi Kanya Bhagyashree Yojana|
आजच्या या लेखामध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या एका महत्त्वपूर्ण अशा योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सदर योजना ही ज्या पालकांना एकच मुलगी आहे अशा पालकांना शासनातर्फे पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहेत. योजना नेमकी कोणासाठी असणार आहे? तसेच आपत्य म्हणून दोन मुली असतील तर या योजनेचा लाभ मिळणार की नाही? सविस्तर अशी माहिती आपण घेणार आहोत.
Majhi Kanya Bhagyashree Yojana
पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये मुलगा मुलगी असा भेदभाव न करता दोन्हींना समान शिक्षण तसेच चांगली वागणूक द्यावी व समाजामध्ये मुलींबाबत असलेला नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत.
त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र शासनाकडून देखील हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली जात आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास अर्ज भरून द्यावा लागतो. योजनेचा अर्ज आपणास ग्रामीण तसेच नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा परिषद, विभागीय महिला उपायुक्त यांच्या कार्यालयात उपलब्ध करून दिला जातो.
लाभार्थी निकष
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतलेली असावी. तरच अशा पाल्यांच्या म्हणजेच मुलीच्या बँक खात्यात पन्नास हजार रुपये शासनातर्फे दिले जातात.
हे पण वाचा :- या योजनेअंतर्गत लहान मुलांसाठी मिळणार प्रत्येकी 2500/- रुपये
जर पालकांना आपत्य म्हणून दोन मुली असतील आणि त्यांनी देखील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असेल तर दोन्ही मुलींच्या बँक खात्यात प्रत्येकी 25 हजार रुपये शासनातर्फे दिले जातात.
ज्या पालकांना दोन मुली आहेत ते देखील या योजनेत पात्र असतील परंतु जर तिसरे अपत्य जन्मास आल्यास या योजनेचा पहिल्या दोन मुलींना लाभ मिळणार नाही.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांना अर्जासोबत मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलीच्या जन्मानंतर तिची जन्म नोंद ही ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका तसेच महानगरपालिका या ठिकाणी केलेली असावी.
या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तसेच शासन निर्णय पाहण्यासाठी
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.