Bal Sangopan Yojana Maharashtra:- या योजनेअंतर्गत लहान मुलांसाठी मिळणार प्रत्येकी प्रती महिना 2500/- रुपये !

Spread the love

Bal Sangopan Yojana Maharashtra

Bal Sangopan Yojana Maharashtra
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे आपणास नवनवीन सरकारी योजना आपल्या पर्यंत पोहोचवत असतो.आज अशाच एका नवीन सरकारी योजनेबद्दल आपण माहिती घेणार आहोत.महाराष्ट्र शासन नेहमीच लोक कल्याणकारी योजना राज्यातील विविध लहान थोर व्यक्तींसाठी राबवत असते.

काय आहे योजना?

महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत लहान मुलांसाठी बाल संगोपन योजना राबविली जात आहे.

योजनेबद्दल माहिती

या योजनेद्वारे सरकार अनाथ तसेच बेघर मुलांना दरमहा २५००/- रुपये अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करते. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई लक्षात घेता सरकारने दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रकमेत देखील वाढ केली आहे.या योजने अंतर्गत पालकास प्राप्त होणाऱ्या परिपोषण अनुदानात रुपये 1100/- वरून 2250/- रुपये आणि आत्ता 2500/- रुपये अनुदान वितरित केले जाते. सदरची वाढ ही 01 एप्रिल 2023 पासून केली जात आहे.

हे पण वाचा :- तुमच्या ग्रामपंचायतची मतदान यादी जाहीर,चेक करा यादीत आपले नाव आहे की नाही ?

योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील अनाथ प्रवर्गातील तसेच बेघर मुलांचे योग्य प्रकारे पालन पोषण व्हावे.तसेच वैयक्तिक जीवनमान सुधारण्यासाठी आणि मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्या म्हणुन सरकार हे अनुदान वितरित करते.

Required Documents for Bal Sangopan Yojana Maharashtra

बाल संगोपन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1) बालकाचा शाळेचा बोनाफाईड दाखला
2) बालकाचे व पालकाचे आधार कार्ड झेरॉक्स
3)गाव कामगार तलाठी यांचा रहिवाशी दाखला
4)रेशन कार्ड झेरॉक्स
5)आई किंवा वडील यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र
6)बालकाचा पासपोर्ट आकाराचे फोटो
7)अर्जाचा नमुना
8)पालकांचा उत्पन्नाचा दाखला

How to Apply Bal Sangopan Yojana Maharashtra

बाल संगोपन योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

1) सदर योजनेसाठी राज्यातील दवाखाने/पोलिस स्टेशन/न्यायालये/कारागृह/कौटुंबिक हिंसाचार कायद्याखालील संरक्षक अधिकारी हे शिफारस करू शकतात.
2) मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था देखील पात्र बालकांच्या अनुदानासाठी शिफारस करू शकतात.
3)जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या बाल विकास विभागामध्ये सदर योजनेचा फॉर्म मिळेल.

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

1) 0 ते 18 वयोगटातील बालके
2) अनाथ किंवा ज्यांच्या पाल्यांचा शोध लागत नाही, व जी दत्तक देणे शक्य नाही अशी बालके.
3)एक पालक असलेली व कुटुंब कलहामध्ये (Family Crisis) मध्ये असलेली बालके.
4)मृत्यू,घटस्फोट,विभक्तिकरण,परित्याग,अविवाहित मातृत्व,गंभीर आजार,पालक रुग्णालयात असणे इ. कारणांमुळे विघटित झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके.
5)कुष्ठरोग व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके.
6) एच.आय.व्ही ग्रस्त/बाधित बालके.
7)तीव्र मतिमंद /Multiple disability बालके ,दोन्ही पालक अपंग आहेत अशी बालके .
8)शाळेत न जाणारे बाल कामगार .(कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेली बालके)

अनुदान वितरण

1)या योजनेखाली दर महिन्याला लाभार्थ्यांच्या पालकांच्या नावांवर असलेल्या बँक / पोस्ट खात्यात
अनुदान वितरित करण्यात यावे,ही जबाबदारी संबंधित संस्थेची राहील.
2)जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडून दर 06 महिन्यांनी स्वयंसेवी संस्थांना अनुदान वितरीत करण्यात यावे व संस्थांनी लाभार्थी कुटुंबांना दरमहा वितरित करावे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment