Sheli Palan Yojana:- १० शेळ्या १ बोकड योजना गट वाटप सुरू.

Spread the love

Sheli Palan Yojana

Sheli Palan Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आज आपण महाराष्ट्र शासनाच्या शेळी पालन योजना २०२३ बद्दल माहिती घेणार आहोत.त्यासाठी ऑनलाईन अर्ज कुठे करायचा?त्यासाठी शासनाचे किती अनुदान मिळेल? पंचायत समितीची शेळी पालन योजना काय आहे?त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?या बद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

शेळी पालन योजने विषयी माहिती
Sheli Palan Yojana

१.सदरील योजना ही मुंबई तसेच मुंबई उपनगर भागात लागू केली जाणार नाही.

२.शेळी पालन योजने अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र,विदर्भ,मराठवाडा विभागामध्ये उस्मानाबादी तसेच संगमनेरी शेळ्या पालनासाठी वितरित केल्या जातात.

३.शेळी पालन योजने अंतर्गत कोकण आणि विदर्भात स्थानिक हवामानाला साथ देतील अश्याच शेळी आणि बोकडांचे गट वितरित केले जातात.

हे पण नक्की वाचा:- अंडी देणाऱ्या 1000 कोंबड्यांच्या कुक्कुटपालनासाठी मिळणार 25 लाख रूपये अनुदान!

लाभार्थी निवडीसाठी चे निष्कर्ष खालील प्रमाणे

१.लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

२.तो दारिद्र्यरेेषेखालील असावा.

३.जमीन धारणा लहान शेतकरी (१ ते २ हेक्टर)

४.सुशिक्षित बेरोजगार (रोजगार आणि स्वयंरोजगार नोंदणीकृत)

५.महिला बचत गटांचे लाभार्थी (कमाल १ ते ४)

ऑनलाईन अर्ज कुठे करायचा?

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा http://mahamesh.co.in/

त्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांसाठी स्थानिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनुदान जाहीर केले आहे. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.Sheli Palan Anudan

शासनाने १० उस्मानाबादी तसेच संगमनेरी शेळ्या आणि आणि बोकड साठी ७७ हजार ६५९ रुपये इतके अनुदान वितरित केले आहे.त्याच बरोबर लाभार्थी हिस्सा हा २५ हजार ८८६ रुपये इतका असेल.अनुसूचित जाती आणि जमाती च्या लाभार्थ्यास अनुदान रक्कम ही वेगळी असेल.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा तसेच नवनवीन माहिती आणि सरकारी योजना जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुप ला नक्की जॉइन व्हा.

Leave a comment