Union Bank of India Personal Loan
Union Bank Of India Personal Loan
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.व्यक्तीच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशाची गरज भासत असते.त्यामुळे लोकांची ही पैशाची गरज ओळखून अनेक बँकांनी पर्सनल लोनची(Union Personal Loan) सुविधा चालू केली आहे.आता तंत्रज्ञानाच्या युगात बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत.बँका देखील ऑनलाईन पद्धतीने पर्सनल लोन देत आहेत.
आज आपण या लेखाच्या माध्यमातून युनियन बँक ऑफ इंडियाकडून दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जबद्दल जाणून घेणार आहेत.त्यासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा याची सर्व माहिती जाणून घेणार आहोत.युनियन बँकेकडून पगार नसलेल्या व्यक्तींना(Apply today for Personal Loan-Non-Salaried) दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाची माहिती जाणून घेऊ या.
युनियन बँक ऑफ इंडिया वैयक्तिक कर्जाचा उद्देश
Union Bank of India Personal Loan
अनेक व्यक्तींच्या पैशाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. त्यासाठी अनेक बँका पर्सनल लोन देतात.किंवा काही ग्राहक क्रेडिट कार्ड सारख्या सुविधा वापरतात.युनियन बँक ऑफ इंडिया कडून लग्नासाठी, गृहपयोगी वस्तूंची खरेदी, प्रवास,सुट्टी इत्यादी गोष्टींसाठी वैयक्तिक कर्ज दिले जाते.
हे पण वाचा:- 10 लाख रुपयांपर्यंतचे मुद्रा लोन मिळवा,अशा प्रकारे करा अर्ज!
वैयक्तिक कर्जासाठी आवश्यक पात्रता
१.पगार नसलेल्या व्यक्तींकडे नियमित उत्पन्नाचा स्त्रोत असणे आवश्यक आहे.
२.कर्जदाराचे कमीत कमी 25 वर्षे वय असायला हवे.
३.कर्जदार व्यक्तीचे वय हे परतफेडीच्या वेळी जास्तीत जास्त 75 वर्षे चालते.त्यापेक्षा अधिक वय चालणार नाही.
४.कर्जसाठी प्रस्ताव करण्यापूर्वी अर्जदार हा युनियन बँक ऑफ इंडियाचा 24 महिने जुना ग्राहक असावा.
५.अर्जदाराच्या खात्याचे रेकॉर्ड हे चांगले असावे.
६.चेक बाऊन्स किंवा इतर कोणत्याही प्रकारचे चुकीचे व्यवहार केलेले असू नयेत.
७.युनियन बँकेकडून दिले जाणारे वैयक्तिक कर्ज हे मुदत कर्ज असणार आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाचे वैयक्तिक कर्ज मर्यादा
Union Bank of India Personal Loan Limit
१.युनियन बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी कमीतकमी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आली नाही.
२.परंतु जास्तीत जास्त कर्जाची मर्यादा रक्कम खालीलप्रमाणे
३.नवीन किंवा पहिल्यांदाच कर्जदार असल्यास जास्तीत जास्त कर्ज मर्यादा ही 5 लाख रुपये आहे.
४.तसेच 2 वर्षांच्या समाधानकारक परतफेडीची नोंद असलेले विद्यमान कर्जदारांना कर्जाची मर्यादा ही जास्तीत जास्त 15 लाख रूपये असणार आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
कर्ज परतफेडीची मुदत
जास्तीत जास्त परतफेड कालावधी खालील दोन पैकी आधीचा असेल
•5 वर्षे (60 महिने)
•वयाच्या 75 वर्षापर्यंत
सदर कर्जासाठी कुठलीही सेक्युरीटी घेतली जात नाही फक्त अर्जदाराच्या जोडीदाराने सह-अर्जदार म्हणून सामील होणे आवश्यक आहे.परंतु जर कर्जदार अविवाहित/विधवा/घटस्फोटित असेल तर मात्र एखाद्या व्यक्तीची हमी लागते.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.