PM Mudra Scheme 2023 Apply:- 10 लाख रुपयांपर्यंतचे मुद्रा लोन मिळवा,असा प्रकारे करा अर्ज !Apply Now

Spread the love

PM Mudra Scheme 2023 Apply

PM Mudra Loan Apply Online
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.केंद्र सरकारने देशातील व्यावसायिकांसाठी 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली होती.या योजनेच्या अंतर्गत देशातील SME आणि MSME उद्योगांसाठी कर्ज दिले जाते.कर्जाची मर्यादा ही 50 हजार रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.ज्या नवीन व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे अशा सर्व व्यावसायिकांना पीएम मुद्रा योजनेच्या अंतर्गत कर्ज मिळविता येते.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून पी एम मुद्रा योजनेच्या अंतर्गत कर्ज कसे मिळवायचे?,अर्ज कुठे करायचा?,कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे,कर्जाची मर्यादा,कर्ज घेण्यासाठी आवश्यक पात्रता,कर्जाचे फायदे इ. माहिती सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत.

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PM Mudra Loan Yojana)

केंद्र सरकारच्या सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे देशातील सूक्ष्म आणि लघु उद्योजकांसाठी भाग भांडवल मिळावे या करिता ही योजना सुरू केली आहे.MUDRA म्हणजे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट आणि रिफायनान्स एजन्सी.या योजनेच्या अंतर्गत व्यापारी बँका,ग्रामीण बँका,लघु वित्त बँक,सहकारी बँका,MFI आणि NBFC बँकांच्या मार्फत सूक्ष्म आणि लघु उद्योजकांसाठी तीन प्रकारच्या कर्जाचे वाटप केले जाते.ते आपण पुढे पाहणार आहेत.PM Mudra Scheme 2023 Apply

सदर योजनेतून कर्ज मंजूर झाल्यास त्या कर्जाची परतफेड ही 5 वर्षांच्या आत करावी लागते.या करिता कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.या योजनेसाठी कमाल वार्षिक 12 टक्के व्याज आकारले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेची उद्दिष्ट्ये
Objectives Of Pradhan Mantri Mudra Loan Scheme

PMMY योजनेचा मुख्य उद्देश हा देशातील तरुण उद्योजकांना आर्थिक पतपुरवठा करणे हाच आहे.देशात असे अनेक उद्योजक आहेत ज्यांची उद्योग उभारण्याची फार इच्छा आहे परंतु आर्थिक अडचणीमुळे ते व्यवसाय उभा करू शकत नाहीत.हीच बाब सरकारच्या लक्षात आल्याने देशात स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.PM Mudra Scheme 2023 Apply

या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेण्याची प्रक्रिया ही इतर कर्ज प्रकरणाच्या तुलनेत सुलभ आणि सोपी आहे.आणि विशेष बाब म्हणजे या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी कर्जदाराला 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतीही सेक्युरिटी द्यावी लागत नाही.

प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्जाचे प्रकार
Types Of PM Mudra Loan Scheme

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे कर्ज विविध तीन प्रकारांमध्ये देण्यात येते.शिशु लोन,किशोर लोन आणि तरुण लोन PM Mudra Scheme 2023 Apply

१.शिशु कर्ज
ज्या व्यक्तींचा व्यवसाय हा लहान स्वरूपाचा आहे किंवा ज्यांना नवीनच व्यवसाय सुरू करायचा अशा व्यक्तिंना या प्रकारचे कर्ज दिले जाते.या गटातील कर्जदारांसाठी जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

२.किशोर कर्ज
या गटातील कर्जदारांसाठी कर्जाची मर्यादा ही किमान 50 हजार रुपये ते जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंत दिली जाते.

३.तरुण कर्ज
या गटातील कर्जदारांसाठी व्यवसायासाठी किमान 50 हजार ते जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.PM Mudra Scheme 2023 Apply

हे पण वाचा:- बंधन बँकेकडून मिळवा 50 हजार चे कर्ज तेही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

1.Transport Vehicle
2.Community,Social &Personal Service Activities
3.Food Product Sector
4.Textile Products Sector/Activity
5.Business Loans For Traders And Shopkeepers
6.Equipment Finanace Scheme for Micro Units
7.Activities allied to agriculture

प्रधानमंत्री मुद्रा योजना आवश्यक कागदपत्रे

१.आधार कार्ड
२.पत्त्याचा पुरावा जसे की लाईट बिल,मतदान कार्ड इ.
३.जातीचा दाखला
४.व्यवसायाचा पत्त्याचा पुरावा जसे की भाडेकरार किंवा इतर कोणतीही कागदपत्रे
५.बँक खात्याचे मागील सहा महिन्यांचे स्टेटमेंट
६.मागील 2 वर्षांचे बॅलन्स शीट आणि इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (२ लाख किंवा त्यापेक्षा अधिक कर्जासाठी)PM Mudra Scheme 2023 Apply
७.पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

प्रधानमंत्री मुद्रा योजना साठी अर्ज कसा करायचा?
How to Apply Online for Pradhan Mantri Mudra Loan Scheme

हे पण वाचा:- अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना सुरू,आता 15 लाख रुपयांपर्यंत लाभ घेता येणार!

प्रधानमंत्री मुद्रा योजना साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री मुद्रा योजना साठी अर्ज करण्यासाठी आपण आपले बँक खाते असलेल्या बँकेत जाऊन देखील अर्ज करू शकणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment