Namo Shettale Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील ८२% शेती ही कोरडवाहू असून ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. राज्याच्या विविध भागात पावसाचे होणारे असमान वितरण आणि पावसामध्ये येणारे मोठे खंड (Dry Spells) या प्रमुख नैसर्गिक अडचणींवर मात करण्यासाठी शेतावर शेततळयासारखी पायाभूत सुविधा उभी करुन पाण्याची साठवणूक करणे, शेतक-यांचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी पाण्याची साठवणूक वाढविणे त्याचप्रमाणे शेतीला पूरक मत्स्य व्यवसायासारखे शेती संलग्न व्यवसाय उभारता यावे.
Table of Contents
याकरिता शेतावर शेत तळयासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना देण्याच्या अनुषंगाने मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात राबविण्यात येत असलेल्या नमो ११ सुत्री कार्यक्रमांतर्गत “नमो शेततळे अभियान” राबविण्यात येणार आहे.
Namo Shettale Yojana
१. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या नमो ११ सुत्री कार्यक्रमांतगर्त राज्यात “नमो शेततळे अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राज्यात ७३०० शेततळे उभारण्यात येतील.
२. छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेच्या मागेल त्याला शेततळे या घटकांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळयांचा समावेश सदर अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळयांमध्ये करण्यात येईल.
३. छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेंतर्गत मागेल त्याला शेततळे या घटकाकरिता उपलब्ध निधीतुन नमो शेततळे अभियान राबविण्यात यावे.
४. सदर अभियानाच्या अंमलबजावणी करिता छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेच्या निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील.
हे पण वाचा:- राज्यातील या शेतकऱ्यांच्या खात्यावर 613 कोटींचा पीक विमा,चार दिवसांत होणार जमा!
शेतकऱ्यांना होणारे फायदे
Namo Shettale Yojana
१.शेतकऱ्यांना वर्षभर पाण्याची टंचाई जाणवणार नाही.
२.शेतीला भरपूर प्रमाणात पाणी मिळेल.
३.पाण्याअभावी पिके वाया जाणार नाहीत.
४.शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल.
५.शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून मस्त्यपालन देखील करता येणार आहे.
नमो शेततळे योजनेचा शासन निर्णय जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.