आता घरबसल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा,जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया! Aadhaar Mobile Link

Spread the love

Aadhaar Mobile Link
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आपल्या आधार कार्डशी आपला मोबाईल नंबर लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे.विविध सरकारी सेवा योजनांचा लाभ घेण्यासाठी,विविध योजनांची केवायसी करण्यासाठी तसेच बऱ्याच शासकीय योजनांसाठी ऑनलाईन पोर्टल वरून अर्ज करण्यासाठी आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवूनच अर्ज भरता येतो.त्यामुळे आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे खूप गरजेचे आहे.

बऱ्याच नागरिकांचा मोबाईल नंबर हरवलेला असतो, बदललेला असतो किंवा आधार कार्डशी लिंक केलेला नसतो.आधार कार्डशी मोबाईल क्रमांक लिंक(Aadhar Mobile Link) करण्यासाठी नागरिकांना आधार सेंटर वर जावे लागते.बऱ्याच वेळा आधार सेंटर वर जास्त गर्दी असल्याने किंवा सर्व्हर बंद असल्याने अनेक हेलपाटे मारावे लागतात.त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसाठी ही प्रक्रिया खूप किचकट आहे.

हे पण वाचा:- तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे का?नसेल तर होईल मोठे नुकसान!

आता आपल्याला मोबाईल वरून घरबसल्या आपल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करता येणार आहे. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी कसा लिंक करायचा? याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत वाचणे आवश्यक आहे.

आधार कार्डशी मोबाईल नंबर कसा लिंक करायचा?

•मित्रांनो आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँक च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल त्याची लिंक खाली दिलेली आहे.

•आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे आपल्याला खूप साऱ्या सुविधांसाठी पर्याय दाखविले जातील.

•तुम्हाला AADHAAR-MOBILE UPDATE या पर्यायावर समोरील चेक बॉक्सवर क्लिक करायचे आहे.

•आता आपल्याला खाली एक फॉर्म असेल तो फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे.

•तसेच Any specific request या पर्याय समोरील बॉक्स मध्ये need to update mobile number with aadhaar असे लिहायचे आहे.

•आता टर्म्स आणि कंडीशन समोरील चेक बॉक्स मार्क करायचे आहे.

•पुढे Captcha कोड टाकून Submit नावाच्या बटणावर क्लिक करायचे आहे.

•तुम्ही केलेली विनंती तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाईल तसेच पोस्टमन आपल्या घरी येऊन आपला मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डशी लिंक करून देतील.

अशा प्रकारे आपण घरबसल्या आपल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करू शकणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment