Aadhar PAN Link Update :- तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे का? असे चेक करा,लिंक नसेल तर भरावा लागेल दंड!

Spread the love

नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आजकाल आधार कार्ड हा महत्त्वाचा पुरावा म्हणून सर्व सरकारी कामकाजात वापरला जातो.आजकाल प्रत्येक व्यक्तींकडे आपले आधार कार्ड असणे आवश्यक आहे.त्याचबरोबर पॅन कार्ड देखील महत्वाचे दस्तऐवज आहे.देशातील कर चोरी रोखण्यासाठी तसेच अवैध मार्गाने आलेल्या पैशांची शहानिशा करण्यासाठी पॅन कार्ड खूप महत्त्वाचे आहे.

मागील काही दिवसांपासून सरकारच्या वतीने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक(Aadhar PAN Link Update) करण्यास सांगितले जात आहे.टॅक्स चोरीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.तुम्हाला देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात मालमत्ता खरेदी करायची असेल किंवा आयकर भरायचा असेल तर तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी सरकारने ३० जून ही अंतिम मुदत दिली होती.परंतु या मुदतीमध्ये आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू न शकणाऱ्या व्यक्तींना आता १००० रुपये भरून आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करता येणार आहे.जर आपण आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक न केल्यास आपले पॅन कार्ड बंद देखील केले जाऊ शकते.Aadhar PAN Link Update

तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे की नाही याची स्थिती आपण ऑनलाईन पद्धतीने अगदी मोफत जाणून घेऊ शकणार आहेत.त्यासाठी तुम्हाला भारतीय आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक करावे लागणार आहे.आम्ही सदरची पूर्ण प्रक्रिया कशी करायची याची सविस्तर माहिती आपल्याला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत.त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत वाचणे आवश्यक असणार आहे.

हे पण वाचा:- आता घरबसल्या तुमचे आधार कार्ड अपडेट करता येणार,सविस्तर माहिती जाणून घ्या.

१.यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आयकर विभागाच्या incometax.gov.in/iec/foportal या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
२.आपल्यासमोर वेबसाईट ओपन झाल्यानंतर डाव्या बाजूला Quick Links या पर्यायाच्या खालील बाजूस Link Aadhaar Status या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
३.यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक टाकून View Link Aadhaar Status या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
४.यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तुमच्या पॅन आधार लिंकची स्थिती दिसणार आहे.
५.जर तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर लिंक लिहिलेली दिसेल.Aadhar PAN Link Update
६. जर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर लिंक दिसली नाहीतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आवश्यक तपशील दिसेल.

तर अशा प्रकारे आपण आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही याची माहिती ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवरून अगदी मोफत जाणून घेऊ शकणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment