Aadhar Card Update Online
Aadhar Card Update Online
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टल वर आपले स्वागत आहे.आज आपण आधार कार्ड अपडेट विषयी माहिती जाणून घेणार आहोत.संपूर्ण देशात आधार कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून मान्य केला जातो. सरकारी कोणत्याही कामकाजात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे.परंतु तुमचे हेच आधार कार्ड अपडेट केलेले नसेल तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
केंद्र सरकारने आधार कार्ड विषयी नव्याने एक निर्णय जाहीर केला आहे.ज्या नागरिकांचे आधार कार्ड काढून 10 वर्ष पूर्ण झाले असतील अशा नागरिकांना आपले आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे.नसता त्यांचे आधार कार्ड रद्द केले जाईल.त्याकरिता आधार कार्ड अपडेट करणे महत्वाचे आहे.Aadhar Card Update Online
आता तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरील कोणत्याही माहितीमध्ये बदल करावयाचा असल्यास तुम्हाला तो घरबसल्या करता येणार आहे.आधार कार्ड वरील नाव, जन्मतारीख,पत्ता तसेच मोबाईल क्रमांक घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने बदलता येणार आहे.तुम्हाला जर ऑनलाईन शक्य नसेल तर जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जाऊन देखील तुम्ही हे बदल करू शकता.
ऑनलाईन आधार कार्ड कसे अपडेट करायचे?
Aadhar Card Update Online
1)तुम्हाला सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.त्याकरिता येथे क्लिक करा.
2)वेबसाईट ओपन झाल्यानंतर ‘माय आधार’ ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.नंतर त्याच टॅब मध्ये ‘अपडेट आधार’ पर्यायावर क्लिक करायचे आहे.
3)अपडेट आधार मधील “अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाईन” या ऑप्शन वर क्लिक करा.
4)त्यानंतर आधार नंबर च्या ऑप्शन समोर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून खालील Captcha Code टाका.
5)सेंड OTP या ऑप्शन वर क्लिक करा.तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी तो तुम्हाला टाकायचा आहे.आणि लॉग इन बटणावर क्लिक करायचे आहे.
हे पण वाचा:- आता आधार कार्ड पेक्षा हा पुरावा महत्वाचा
6)त्यानंतर तुम्हाला ज्या मजकुरामध्ये बदल करावयाचा आहे.त्या योग्य मजकूराच्या पुराव्याची स्कॅन कॉपी तुम्हाला अपलोड करायची आहे.जसे की पत्ता बदलण्यासाठीलाईट बिल,पासपोर्ट कॉपी अपलोड करावी लागेल.
7)आता तुम्ही केलेले बदल योग्य असल्याची खात्री करून सबमिट या बटणावर क्लिक करा.
8)त्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या लिस्टमधून BPO Service ऑप्शन निवडा.BPO Service प्रोव्हाइडर्स UIDAI व्दारे आधार अपडेट संबंधित रिक्वेस्ट हाताळण्यासाठी अधिकृत केले गेले आहे.ते तुमची माहिती व्हेरीफाय करतील.
9)तुमच्या अपडेट विनंतीची पुष्टी करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
10) रिक्वेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला URN नंबर मिळेल.तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे.त्याद्वारे तुम्ही तुमच्या एप्लिकेशन्सची स्थिती जाऊन घेऊ शकणार आहात.
11)वरील प्रोसेस फॉलो केल्यानंतर ठराविक कालावधीमध्ये तुमच्या आधार कर्डवरील माहिती अपडेट होईल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.