Rule On Aadhar :- आता आधार कार्ड पेक्षा हा पुरावा महत्वाचा,नवीन नियम लागू होणार!

Spread the love

Rule On Aadhar

Rule On Aadhar
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर न्यूज पोर्टल वर आपले स्वागत आहे.आज आपण सदरच्या लेखामधून केंद्र सरकारने आधार कार्ड च्या बाबतीत केलेल्या एका अपडेट बद्दल जाणून घेणार आहोत.

देशामध्ये मागील काही दिवसांमध्ये रेशन कार्ड आणि जन्म दाखला यांना खूप महत्त्व देण्यात आले होते.त्यांनतर त्यांची जागा आधार कार्ड ने घेतली आणि शासनाच्या कुठल्याही कामात आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले.

परंतु अलीकडेच केंद्र सरकारने जन्म दाखल्याबाबत नवीन घोषणा केली आहे.जन्म दाखलाच ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.1 ऑक्टोबर पासून हा नवीन नियम लागू करणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

काय आहे नवीन नियम?

Rule On Aadhar
आता 1 ऑक्टोबर पासून जन्म दाखल्याविषयी नवीन नियम लागू करण्यात येणार आहे.आधार कार्ड,पासपोर्ट, मतदान कार्ड किंवा शाळेत प्रवेश याकरिता जन्म दाखला महत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने मान्सूनच्या सत्रात ही अधिसूचना काढली आहे.हा नियम लागू झाल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही कागदपत्राची गरज पडणार नाही.लहान मुलांचे जन्म दाखले पालकांच्या आधार कार्डशी जोडण्यात येतील.

केंद्र सरकार सरकारी तसेच खाजगी दवाखान्यातून सदरचा डाटा जमा करणार आहे.मान्सूनच्या सत्रात लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये हे बिल मंजूर करण्यात आले.रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेड अमेंडमेंट बिल 2023 असे नाव देण्यात आले आहे.

सदरील बिलामुळे रजिस्ट्रारला जन्म आणि मृत्यूची नोंद कोणतेही शुल्क न आकारता करावी लागेल. तसेच नागरिकांना 7 दिवसांच्या आत प्रमाणपत्र द्यावे लागतील. जर नागरिकांचा रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र द्यावे लागेल.Rule On Aadhar

जर रजिस्ट्रारने कामात दिरंगाई केली तर नागरिकांना त्याच्या विरोधात अपील करण्यात येणार आहे. अपील करण्याचा कालावधी 30 दिवसांचा असणार आहे. रजिस्ट्रारला आपले म्हणणे मांडण्याकरिता 90 दिवसांचा कालावधी असेल.

या नवीन नियमामुळे जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीचा डेटा थेट निवडणूक आयोगाकडे प्राप्त होईल.ज्यामुळे नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी नागरिकांना अर्ज करण्याची गरज पडणार आहे.ज्याचे वय 18 वर्ष पूर्ण झाले आहे त्यांचे नाव आपोआपच मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल. तसेच ज्या मतदारांचा मृत्यू झाला आहे त्यांचे नाव आपोआपच कमी करण्यात येणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment