Adhar Card | तुमचे आधार कार्ड दुसरे कोणीतरी वापरत तर नाही ना?आता तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे ते कळणार एका क्लिकवर!

Spread the love

Adhar Card
देशातील नागरिकांसाठी खाजगी तसेच सरकारी कामासाठी आधार कार्ड हा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून वापरले जाणारे महत्त्वाचे दस्त ऐवज आहे.जेव्हा जेव्हा कोणत्याही कामासाठी आधार कार्ड वापरले जाते तेव्हा तेव्हा त्याचे एक रेकॉर्ड तयार केले जाते.त्यामुळे या रेकॉर्डच्या माध्यमातून आधार कार्डचा वापर कुठे आणि कोणत्या कामासाठी केला गेला आहे याची माहिती जमा केली जाते.तसेच तुमचे आधार कार्ड दुसरे कोणीतरी चुकीच्या कामासाठी वापरत तर नाही ना याची देखील माहिती या रेकॉर्डच्या माध्यमातून मिळवली जाऊ शकते.

असे चेक करा तुमचे आधार कार्डचे रेकॉर्ड

•सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरून यूआयडीएआयच्या https://uidia.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

•वेबसाईट ओपन झाल्यानंतर “माय आधार” या पर्यायावर क्लिक करा.

•नवीन पेज ओपन झाल्यानंतर “आधार प्रमाणीकरण इतिहास” या पर्यायावर क्लिक करा.

हे पण वाचा:- आता उसने पैसे मागण्यासाठी कोणापुढे हात पसरण्याची गरज नाही, फोन पे आणि गूगल पे वरून मिळणार उसने पैसे, व्याज पण लागणार नाही, किती पैसे मिळणार?वाचा संपूर्ण माहिती!

•आता तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.

•पुढे “ओटीपी पाठवा” या पर्यायावर क्लिक करा.

•तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका.

•आता “प्रवेश करा” या पर्यायावर क्लिक करा.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचे आधार कार्ड मागील सहा महिन्यात कुठे आणि कशासाठी वापरले गेले आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे.

आधार प्रमाणीकरण इतिहास तपासण्याचे फायदे

•तुमच्या आधार कार्डचा कुठल्या गैर कामासाठी वापर झाला आहे का हे तपासण्यासाठी तुम्हाला मदत करते.
•तुमच्या आधार कार्डचा वापर कोणत्या कामांसाठी झाला आहे याची माहिती तुम्हाला समजते.
•तुमच्या आधार कार्डची सुरक्षितता सुधारण्यासाठी तुम्हाला मदत करते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट द्या.

Leave a comment