या शेतकऱ्यांच्या कर्जावरील तब्बल 5 वर्षांचे व्याज होणार माफ,कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा,जाणून घ्या सविस्तर माहिती!

Spread the love

Agriculture News
अवकाळी पाऊस,गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेडनेट आणि हरितगृहांचे नुकसान झाले आहे,अशा शेतकऱ्यांनी शेडनेट आणि हरितगृह उभारणीसाठी घेतलेल्या कर्जांवरील पुढील पाच वर्षांचे व्याज माफ केले जाईल,ते व्याज सरकार भरेल, याबाबतच्या योजनेची लवकरच घोषणा केली जाईल,अशी माहिती कृषिमंत्री(Agriculture News) धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत विरोधी पक्षाने अवकाळीच्या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव मांडला होता.या स्थगन प्रस्तावाला उत्तर देताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले,आजवर शेडनेट, हरितगृहांचा समावेश कोणत्याही विमा योजनेत होत नव्हता.शेडनेट, हरितगृहधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.

Agriculture News

ही दीर्घकालीन आणि मोठी गुंतवणूक असते.वादळी वारे, गारपीट,अवकाळीत नुकसान झालेल्या शेडनेट,हरितगृहाचे पंचनामे होत नव्हते.आता नुकसान झालेल्या शेडनेट, हरितगृहांचे सर्वेक्षण आणि पंचनामे होतील.शेडनेट, हरितगृहधारक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,असा विश्वासही मुंडे यांनी दिला.

हे पण वाचा:- राज्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी २० हजार रुपये,मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा,पहा तुम्हाला किती मिळणार!

पीक विमा योजना,नमो शेतकरी सन्मान योजना,स्मार्ट, पोकरा आदी योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू आहेत. एक रुपयात पीक विमा योजना महत्त्वाकांक्षी आहे. एक रुपयात पीक विमा मिळत असल्यामुळे खरीप हंगामात १.७० कोटी आणि रब्बी हंगामात ७१ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.पीक विमा योजनेची सविस्तर माहिती विरोधी पक्षनेत्यांनी घेतली नाही.

कोकणात भातापासून वाइन निर्मिती उद्याोग वाढीस लागावा,यासाठी संशोधन करण्यात येईल.कोकणपट्ट्यात आंबा,काजू,भातसारख्या शेतीमालावर प्रक्रिया उद्याोग वाढीस लागावा यासाठी प्रयत्न केले जातील,असेही मुंडे म्हणाले.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment