Anandacha Shidha:-आता आनंदाचा शिधा वाटपात ज्वारी,बाजरी,नाचणीचा समावेश होणार!

Spread the love

Anandacha Shidha
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यात गतवर्षी दिवाळी पासून सुरु करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा योजनेतील चार अन्न पदार्थमध्ये ज्वारी,बाजरी, किंवा नाचणी यापैकी एका पदार्थाचा समावेश केला जाणार आहे.सणासुदीच्या काळात १०० रुपयात पाच अन्न पदार्थ देण्याची ही योजना वर्षभर राबविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिंदे सरकारने गेल्या वर्षी दिवाळीत या सरकारने १०० रुपयात आनंदाचा शिधा(Anandacha Shidha) ही योजना प्रत्यक्षात आणली. पहिल्या वर्षी दिवाळीत रवा,चनाडाळ,साखर आणि खाद्यातेल हे चार पदार्थ देण्यात आले होते.यंदाच्या दिवाळीत या वस्तूंचे वजन कमी करुन मैदा व पोहे हे दोन पदार्थ वाढविण्यात आले.त्यापूर्वी ही योजना गुढीपाडवा आणि गणेशोत्सव काळात राबविण्यात आली होती.

हे पण वाचा:- लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत सरकार मुलींना देत आहे १ लाख १ हजार रुपये!

सदरची योजना राबविल्याने राज्यातील गरीब कुटुंबांना १०० रुपयात चार अन्न पदार्थाच्या वस्तू मिळत आहेत.याचा गरीब कुटुंबातील लहान मुले,मुली यांना चांगला फायदा होताना दिसत आहे.तसेच या योजनेविषयी लोकांच्या मनात चांगली भावना निर्माण झाली आहे.राज्यातील गरीब कुटुंबांची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारच्या वतीने आनंदाचा शिधा योजनेत ज्वारी,बाजरी किंवा नाचणीचा समावेश केला जाणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment