Anandacha Shidha
Anandacha Shidha
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले आहेत.राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राज्यातील नागरिकांना दिवाळीसाठी ‘आनंदाचा शिधा‘ वाटप करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.Anandacha Shidha
Table of Contents
काय आहे शासन निर्णय?
अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या ०३.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे.Anandacha Shidha
हे पण वाचा:-आता तुमचा 12 अंकी रेशन कार्ड नंबर जाणून घ्या तुमच्या मोबाईलवरून
कोणकोणत्या वस्तूंचा समावेश आहे ?
हा आनंदाचा शिधा आगामी सन २०२३ मधील दिवाळी सणानिमित्त १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहा असे ६ शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” दि. २५ ऑक्टोबर, २०२३ पासून दि. ३० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत ई-पॉस प्रणालीद्वारे र १००/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
शिधाजिन्नस संचात समाविष्ट शिधाजिन्नस खराब होण्याची/ खाण्यास अयोग्य होण्याची मुदत (expiry date) साखर, चना डाळ, पोहा, खाद्यतेल याकरीता कमीतकमी ४ महिन्यांची व मैदा, रवा याकरीता कमीतकमी ३ महिन्यांची असल्याची खात्री करूनच पुरवठादाराकडून शिधाजिन्नस संच स्विकारण्यात यावेत.असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
शासन जीआर निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.