Ration Card Number:- आता तुमचा 12 अंकी रेशन कार्ड नंबर मोबाईलवरून चेक करता येणार,जाणून घ्या कसे?

Spread the love

Ration Card Number

Ration Card Number
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आता तुमच्या रेशन कॉर्डला देखील आधार क्रमांकासारखा 12 अंकी नंबर मिळाला आहे. बऱ्याच रेशन कार्ड धारकांना आपला 12 अंकी रेशन कार्ड नंबर माहीत नसतो.आज आपण या लेखामधून 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक कसा माहित करून घ्यायचा हे जाणून घेणार आहेत.

आताच्या ऑनलाईन युगाच्या काळात तुम्हाला तुमचा 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक माहित असणे फार गरजेचे आहे. कारण कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड क्रमांक महत्वाचा असतो.त्याचबरोबर तुम्हाला शासनाकडून नेमके किती रेशन मिळते हे ऑनलाईन पद्धतीने चेक करता येणार आहे.तुमच्या गावातील रेशन दुकानदार तुम्हाला किती रेशन वाटप करतो हे देखील तुम्हाला चेक करता येते.Ration Card Number

सध्या राज्य सरकारने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रेशन कार्ड ऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी अर्ज भरण्याकरिता 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक आवश्यक आहे.

हे पण वाचा:- आता तुमचे रेशन कार्ड तुमच्या मोबाईल वरून डाउनलोड करता येणार


आज आपण तुमच्या मोबाईलवरून आपला 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक कसा जाणून घ्यायचा या बद्दलची माहिती घेणार आहोत.रेशन Card Number

कसा चेक करायचा 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक ?
Ration Card Number

तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन वरून तुमचा 12 अंकी रेशन कार्ड क्रमांक(Ration Card Number) माहित करून घेता येणार आहे.त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा किंवा तुमचा स्वतःचा आधार कार्ड क्रमांक माहित असणे आवश्यक आहे.चला तर मग जाणून घेऊ या कसा चेक करायचा रेशन कार्ड नंबर.

१.तुम्हाला तुमचा रेशन कार्ड क्रमांक ऑनलाईन पद्धतीने जाणून घेण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.

२.त्यासाठी तुमच्या मोबाईल फोन मधील गूगल प्ले स्टोअरवर जावे लागेल.

३.गूगल प्ले स्टोअरवर सर्च बार मध्ये तुम्हाला “Mera Ration” हे केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेले मोबाईल ॲप्लिकेशन सर्च करावे लागेल.

४.ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करून इंन्स्टॉल करून ओपन करून घ्यावे.

५.हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर बरेच ऑप्शन दिसतील त्यातील तुम्हाला “Aadhar Seeding” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

६.”Aadhar Seeding” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर रेशन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक असे दोन पर्याय दिसतील.त्यातील तुम्हाला आधार कार्ड क्रमांक या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

७.आता तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचा किंवा तुमचा स्वतःचा आधार क्रमांक तिथे तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट नावाच्या बटणावर क्लिक करायचे आहे.

८.आता तुमच्यासमोर तुमच्या रेशन कार्डचा संपूर्ण तपशील तुम्हाला 12 अंकी रेशन कार्ड क्रमांकासह दिसणार आहे.

“Mera Ration” ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment