प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0 ची घोषणा,गॅस सिलिंडर वर मिळणार 400 रुपये सूट! (PM Ujjwala Yojana 2.0)

Spread the love

PM Ujjwala Yojana 2.0

PM Ujjwala Yojana 2.0
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.देशातील होणारे हवा प्रदूषण आणि जंगलतोड कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 2018 साली संपूर्ण देशभर एक योजना सुरू केली.या योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

2018 साली सुरू करण्यात आलेल्या पीएम उज्वला योजने अंतर्गत देशातील 5 कोटी कुटुंबांना महिलांच्या नावे गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.आता पीएम उज्वला योजना 2.0 दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे.देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे याची माहिती दिली.

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे आणि व्यक्तींचा दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे.

हे पण नक्की वाचा:- या मंडळातील १३८ गावांना मिळणार दिवसा वीज

उज्वला योजनेसाठी आवश्यक पात्रता

1.सदर योजनेकरीता फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
2.महिलांचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
3.त्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याचे नावे गॅस कनेक्शन नसावे.
4.SC किंवा ST प्रवर्गातील महिला
5.प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेच्या लाभार्थी महिला
6.अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थी महिला
7.वनवासी,नदी किंवा नदी बेटांवर राहणारे कुटुंब
8.SECC कुटुंब किंवा 14 पॉइंट्स नुसार सूचीबद्ध कुटुंबे

उज्वला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1.महिला उमेदवाराचे आधार कार्ड
2.कुटुंबातील सर्व व्यक्तींचे ओळखपत्र
3.दारिद्र्य रेषेखालील पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
4.बँकेचे पासबुक
5.बँकेचा IFSC कोड
6.आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक
7.पासपोर्ट आकाराचे फोटो

पीएम उज्वला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

1.पी एम उज्वला योजनेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
2.त्यानंतर पी एम उज्वला योजनेच्या फॉर्म वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल.
3.तुमची जवळची गॅस पुरवठा कंपनी निवडावी लागेल.
4.फॉर्म मधील सर्व माहिती अचूक भरावी लागेल.
5.जसे की तुमचे नाव, ई मेल आयडी,फोन नंबर
6.फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीला सबमिट करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment