Antim Paisewari:- अखेर दुष्काळावर शिक्कमोर्तब,या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 50 पैशाखाली!

Spread the love

Antim Paisewari
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यात ४० तालुके आणि १०२१ पेक्षा जास्त महसूल मंडळे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.केंद्रीय पथक दुष्काळाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात आले आहे.दुष्काळी परिस्थिती वर शिक्कामोर्तब करण्यासाठी एक अंतिम घटक म्हणजे पैसेवारी/आणेवारी(Antim Paisewari) हा घटक अजून बाकी आहे. राज्यातील कोणत्याही तालुक्याची किंवा महसूल मंडळाची पैसेवारी/आणेवारी जाहीर करण्यात आली नाही.

या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर

राज्यात दुष्काळी तालुक्यांची तसेच महसूल मंडळांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्याची प्रक्रिया १५ डिसेंबर पासून सुरू केली जात आहे.आता जालना जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये एकूण ९७० गावांची अंतिम पैसेवारी ही ५० पैशाखली असल्याने जालना जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शिक्कामोर्तब झाले आहे.

जालना जिल्ह्यात एकूण ५१५ गावे ही खरीप पिकाची तसेच ४५६ गावे ही रब्बी पिकाची आहेत.रब्बी पिकांच्या गावात देखील दोन तृतीअंश पेक्षा जास्त भागामध्ये पेरणी झाल्याने या गावांची सुद्धा पैसेवारी काढण्यात आली आहे. एकूण ९७१ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आली आहे.रानिवहिगाव हे निमा दुधना प्रकल्पात बुडीत असल्याने या गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.उर्वरित ९७१ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आलेली आहे.

हे पण वाचा:- नमो शेतकरी, पीकविमा,कांदा अनुदान यासाठी ५ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद,राज्य सरकारचा मोठा निर्णय!

तालुकानिहाय गावांची संख्या

जालना तालुक्यातील १५१ गावे,बदनापूर तालुक्यातील ९२ गावे,भोकरदन तालुक्यातील १५७, जाफ्राबाद तालुक्यातील १०१ गावे, परतूर तालुक्यातील ९७ गावे(रानिवहिगाव सोडून),मंठा तालुक्यातील ११७ गावे,अंबड तालुक्यातील १३८ गावे, घनसांगवी तालुक्यातील ११८ गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशांखाली आली आहे.त्यामुळे जालना जिल्ह्यातील या गावांमध्ये दुष्काळावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

राज्यात केंद्रीय पथकांची दुष्काळी पाहणी सुरू आहे तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून देखील पाहणी केली जात आहे.त्यामुळे राज्यातील उर्वरित जिल्ह्यांची देखील पैसेवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे.अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यावर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली जाऊ शकते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment