Apang Pension Yojana 2023:- राज्य सरकारची नवीन योजना,आता या व्यक्तींना मिळणार दरमहा 600 रुपये पेन्शन,जाणून घ्या काय आहे पात्रता?

Spread the love

Apang Pension Yojana

नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवित असते.जेणे करून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा हा मुख्य हेतू असतो.महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील अपंग व्यक्तींना आर्थिक मदत करण्यासाठी अपंग निवृत्ती वेतन योजना(Apang Pension Yojana) सुरू केली आहे.या योजनेचा अंतर्गत राज्यातील अपंग व्यक्तींना दर महिन्याला ६०० रुपये पेन्शन दिली जाते.

लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता

•अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरुपी रहिवाशी असावा.
•अर्जदार व्यक्तीचे वय १८ ते ६५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
•अर्जदार व्यक्ती अपंग असणे आवश्यक आहे.
•अर्जदार व्यक्तीचे अपंगत्व ८० टक्क्यांपेक्षा जास्त असावे.
•अर्जदार व्यक्तीची कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत असावी.

अर्ज कुठे करायचा?

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अपंगत्व असलेल्या व्यक्तीला आपल्या जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण कार्यालयात किंवा जवळच्या तहसील कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही.

हे पण वाचा:- या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणार 1500 रुपये!

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

•अर्जदार व्यक्तीचा रहिवाशी दाखला
•अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
•अर्जदार व्यक्तीचे मतदार ओळखपत्र
•जन्म तारखेचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला
•८० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्याचा दाखला
•तहसीलदार यांनी दिलेला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
•रेशन कार्ड झेरॉक्स
•बँक पासबुक झेरॉक्स

Apang Pension Yojana

योजनेमुळे होणारा फायदा
Apang Pension Yojana Benefits

•अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना आर्थिक मदत करून आत्मनिर्भर बनविणे.
•या योजनेमुळे अपंग व्यक्तींच्या दैनंदिन जीवनाची गरज भागविण्यासाठी मदत होणार आहे.
•अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना सामाजिक न्याय मिळेल.
•अपंगत्व असणाऱ्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment